ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

लोकसभा मतदार संघात कॉग्रेस पक्षातर्फे उमेदवार कोण असे पक्षाचे सर्वेक्षण नाही तर कुणाचातरी खोडसाळपणा!

कॉग्रेस पक्षात अशा प्रकारचा सर्वे झालेला नाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही माहिती

चांदा ब्लास्ट

खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात कॉग्रेस पक्षातर्फे उमेदवार कोण असे सर्वेक्षण समाज माध्यमावर सुरू आहे. दरम्यान हे पक्षाचे सर्वेक्षण नाही तर कुणाचातरी खोडसाळपणा आहे असे पक्षाचे पदाधिकारी व नेते सांगत आहेत.

कॉग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे ३० मे रोजी अकाली निधन झाले. त्यांच्या अकाली निधनानंतर चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. पोटनिवडणुकीची चर्चा सुरू आहे. मात्र अशातच कॉग्रेसच्या वतीने चंद्रपूर लोकसभेसाठी योग्य उमेदवार कोण असे सर्वेक्षण समाज माध्यमावर सुरू आहे.

                 या सर्वेक्षणात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राजुराचे आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, चंद्रपूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि भद्रावतीचे नगराध्यक्ष तथा दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे ज्येष्ठ बंधू अनिल धानोरकर या सात नावांचा समावेश आहे. धानोरकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तेरवीचा कार्यक्रमही अजून आटोपलेला नाही. अशातच कॉग्रेसच्या वतीने अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जात असल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कॉग्रेस पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कुणाचातरी खोडसाळपणा आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही गोंदिया येथे माध्यमांशी बोलतांना कॉग्रेस पक्षात अशा प्रकारचा सर्वे झालेला नाही असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये