Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपंचायतची अग्निशमन यंत्रणा नावाला उपयोग नाही गावाला!

अग्नीशमन यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनाला जबाबदार कोण?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

आग विझविणारी यंत्रणा पोहोचली आग विझल्यावर

जिवती :- ग्रामीण भागात आग विझवण्यासाठी आलेली यंत्रणा नेहमी सक्षम व सतर्क राहायला हवी कारण कधी कुठे काय घडेल याचा नेम नसतो.परंतु जिवती नगरपंचायतची अग्नीशमन यंत्रणाच सक्षम नसल्याचे दिसून येत आहे.शहरात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतरही नगरपंचायतची अग्नीशमन यंत्रणा पोहचली नाही.त्यामुळे नगरपंचायतच्या अग्नीशमन यंत्रणा किती सक्षम व सजग आहे हे जिवतीच्या घटनेवरून पाहायला मिळाले.स्थानिक प्रशासनाने अग्नीशमन यंत्रणेवर नियंत्रण ठेवून योग्य नियोजन करायला हवे पण तसे होताना दिसत नाही.

शनिवारी जिवतीतील मुख्य चौकातील दोन दुकानाला आग लागल्याची माहिती नगरपंचायत यंत्रणेच्या कानावर आली तेंव्हा अग्नीशमन वाहनात पाणी आणि डिझेल भरण्याची यंत्रणेला जाग आली परंतु पाणी आणि डिझेल भरून अग्निशमन यंत्रणा येईपर्यंत दोन्ही दुकाने जळून खाक झाल्यावर आग विझविण्यासाठी पर्यंत करणाऱ्या या यंत्रणेला काय म्हणावे, यंत्रणा अलर्ट ठेवण्याची जबाबदारी कोणाची ? हलगर्जीपणामुळे दोन्ही होलसेल दुकाने जळून खाक झाली याला जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

              गजबजलेल्या विर बाबुराव शेडमाके चौकातील दोन दुकानाला शनिवारी मध्यरात्री अचानक भिषण आग लागून प्रितम नगराळे यांच्या आई ऑटोमोबाईल २५ लाख तर योगेश भदाडे यांच्या किराणा दुकान व कापड केंद्राचे ३५ लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली.गाढ झोपेत घडलेल्या घटनेमुळे कुणालाही भणक लागली नाही परंतु आगिचा भडका आणि धुरा वाढत शेजारच्या डॉ.अंकुश गोतावळे यांच्या घरात घुसल्याने त्यांना जाग आली.बाहेर निघून बघताच आगिचा भडका दिसला त्यांनी तात्काळ नगरपंचायतच्या अग्नीशमन यंत्रणेला कळविले मात्र अग्नीशमन वाहनात डिझेल आणि पाणी भरून ठेवलेले नव्हते त्यामुळे वेळेत या यंत्रणेला पोहोचता आले नाही.जर आदीच हि यंत्रणा अलर्ट राहिली असती तर कदाचित या दुकानातील काही मौल्यवान साहित्य वाचविता आले असते.आई वडिलांपासून पोरके झालेल्या प्रितम नगराळे आणि शुभम नगराळे या भावड्यांच्या डोळ्यात अश्रू पाहण्याची वेळ आली नसती.कुठलाही आधार नसतानाही केवळ जगण्यासाठी शुन्यातून उभारलेला व्यवसाय मनमिळाऊ स्वभावाने लाखोंच्या घरात पोहोचले होते मात्र गाढ झोपेत दुकानाला आग लागली अन् मेहनतीने साकारलेला व्यवसायाची काही क्षणातच राखरांगोळी झाली.या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ वाटत आहे.मात्र आतातरी नगरपंचायतची अग्नीशमन यंत्रणा व स्थानिक प्रशासन अलर्ट होईल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये