Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा

 अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले विनम्र अभिवादन

चांदा ब्लास्ट

 चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग चंद्रपूर, जिल्हा शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग, चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी माथाडी कामगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्ष सय्यद रमजान अली यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष मतीन कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक विभागातर्फे दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस सद्भावना दिन म्हणून साजरा करून भारतरत्न राजीव गांधी यांना उपस्थित सर्व पदाअधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करण्यात आले.

   यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे जिल्हा प्रमुख ताज कुरेशी यांनी भारतरत्न राजीव गांधी यांनी केलेल्या विशेष कार्याचा उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. या वेळेस पर्यावरण विभागाचे जील्हाध्यक्ष ताज कुरेशी,अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस एजाज कुरेशी, माथाडी कामगार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल जमील, माथाडी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष सय्यद आसिफ, बबलू कुरेशी, अमीन शेख, सय्यद रईस, परवेज शेख, अखिलेश जनबंधू, नाझीम शेख, मा. माझ शेख, फिरोज शेख, सह. अन्या पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये