Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोलकता येथील अत्याचाराच्या निषेधार्थ देऊळगाव राजा येथे कॅण्डल मोर्चा

डॉक्टर असोसिएशन तर्फे सर्व खाजगी दवाखाने बंद 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 कोलकत्ता येथे महिला डॉक्टर वरील अत्याचार आणि अमानुष हत्येच्या निषेधार्थ डॉक्टर असोसिएशन तर्फे 16 ऑगस्ट च्या रात्री कॅन्डल मार्च काढून अमानवीय घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.तर २४ तास दवाखाने बंद ठेवण्यात आले. सदर कॅण्डल मार्चमध्ये इतर नागरिकांनी ही सहभाग नोंदविला.

 डॉक्टर असोसिएशन देऊळगाव राजा चे अध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांच्या मार्गदर्शनात छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारका जवळ शहरातील सर्व डॉक्टर,महिला डॉक्टर, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह असंख्य नागरिक सदर कॅण्डल मार्चमध्ये सहभागी झाले. शिवाजी महाराज स्मारकापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकात कॅन्डल मार्च पोहोचले.या ठिकाणी कोलकाता येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ मेणबत्ती सिल्कवण्यात आल्या मेणबत्ती पेटविण्यात आल्या.

यावेळी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर,डॉ. शिल्पा कायंदे, डॉ सुनील कायंदे यांनी मनोगत व्यक्त करताना घडलेल्या अमाननीय घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी डॉ रामदास शिंदे, डॉ गणेश मांटे, डॉ. तारा मुंडे, डॉ भगवान खरात,डॉ.उमेश मुंडे,डॉ अक्षय गुठे,डॉ.अशोक काबरा,डॉ.सुभाष शिंगणे,डॉ विशाल शिंदे,डॉ.तौसिफ़,डॉ.संजय नांगरे,डॉ.पंकज गिते,डॉ.संदीप नांगरे,आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये