Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉक्टर तरुणीचा खून

देऊळगाव मही येथील डॉक्टरांनी निषेध मोर्चा काढत दिल्या संतप्त प्रतिक्रिया;दोन दिवस काम बंद चा निर्णय.!

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 कोलकाताच्या महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे पडसाद राज्यभरासह उमटत आहेत.दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव मही येथील डॉक्टर संघटनेच्या वतीने आज निषेध मोर्चा काढण्यात आला,यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कँडल लावून मृत्यू मुखी पडलेल्या निष्पाप डॉक्टर मौमित डेबनाथ यांना डॉक्टर असोसिएशन देऊळगाव मही च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,तसेच १७ ते १८ ऑगस्ट दोन दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.कोलकता येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ देऊळगाव मही येथील डॉक्टरांनी  या संपाला समर्थन देत सहभाग नोंदवला आहे.

 कोलकाताअत्याचार व हत्या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निषेध मोर्चामध्ये सहभागी डॉक्टरांनी केली आहे. यावेळी डॉ.मनोहर शिंगणे, डॉ सुभाष शिंगणे,डॉ ताठे, डॉ अलका गोडे, डॉ टेकाळे, डॉ महेश दंदाले,डॉ शिंगाडे, डॉ किशोर गीते,डॉ अरुण सोनसळे, डॉ वाघ, डॉ खेडेकर, डॉ रमाकांत सपकाळ, डॉ झाकीर शेख, डॉ सचिन सोनसळे, डॉ वैभव, डॉ शिंदे, डॉ अश्विन, डॉ चेके, डॉ झोटे, डॉ ताठे मॅडम,डॉ शिल्पा दंदाले,डॉ जायभाये,डॉ शिंदे मॅडम, डॉ अस्मा मॅडम, डॉ शिंगाडे मॅडम, डॉ नीता मॅडम यांच्या सह डॉक्टर असोसिएशनचे सर्व सन्मानीय सदस्य उपस्थित होते.

आम्ही डॉक्टर दिवस-रात्र रुग्णसेवा करतो, आमच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाने घ्यावी, डॉक्टरांना सुरक्षित वातावरण प्रदान करावे, कोलकता येथील घटना निंदणीय आहे, ही घटना डॉक्टरांनी सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण करते, या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो .

           डॉक्टर आस्मा शेख,(देऊळगाव मही)

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कठोर कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे आणि महिलांना सामजिक, मानसिक आणि आर्थिक बाबींमध्ये सक्षम बनविणे हे शासनाचे ध्येय असले पाहिजे.आणि  न्यायालयाने यां नराधमांविषयी केवळ नागरीक म्हणुन सहानुभूती न दाखवता त्यांनी केलेल्या नीच, राक्षसी कृत्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा किंवा कठोर पेक्षा कठोर शासन करावे.

            डॉक्टर किशोर गीते (देऊळगाव मही)

आपल्या या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना आदीशक्तीचे रूप समजून तिला पूजनीय मानले जाते.. कारण यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा मोलाचा सहभाग असतो. राजमाता जिजाऊ होत्या म्हणुन छत्रपती शिवाजी महाराज घडले, रमाई आंबेडकरांमुळेच बाबासाहेब संविधान प्रमुख झाले, सावित्रीबाई फुले यांची साथ होती म्हणुन ज्योतीराव फुले महात्मा झाले, अहिल्याबाई होळकर, मदर तेरेसा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा, अशा अनेक महिला आहेत़ की त्यांनी आपल्य़ा भारतासाठी मोलाचे योगदान दिले. असे असताना सुद्धा आपल्या या सुसंस्कृत देशात निर्भया हत्याकांड, कोपर्डी हत्याकांड आणि आताचे कोलकाता येथील हत्याकांड घडले ,यासह अनेक निर्दयी घटना घडल्या ही दुर्दैवी बाब आहे. आज कित्येक तरुणी..महिला शिक्षणासाठी वा नोकरीसाठी बाहेरगावी किंवा अनोळखी ठिकाणी एकट्या राहतात. मग या अशा एकट्या मुलींना पाहून नराधमांचे मनोबल वाढते आणि त्यांच्यातला विकृतीमुळे अमानुष कृत्य घडतात.हे निंदनीय,निषेधार्थ आहे.याविरुद्ध कठोर कायदे, सक्षम यंत्रणा तयार केल्या गेली पाहिजे, कोलकाता येथील घटनेचा  आम्ही निषेध करतो,यातील सर्व नराधमांना फाशी व्हायला हवी.

            डॉक्टर शिल्पा दंदाले,(देऊळगाव मही)

अशा प्रकारच्या होणाऱ्या पाशवी गुन्ह्यास वेळीच आवर घातला पाहिजे. हा कटाक्ष आपल्य़ा न्यायव्यवस्थेकडे असला पाहिजे.त्याचप्रमाणे पोलिसांची रस्त्यावर जास्तीत जास्त गस्त हवी. निर्मनुष्य रस्त्यावर पोलिस यंत्रणा सज्ज हवी, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. व्हिडिओ क्लिपस, पॉर्न साईट व अश्लील दृश्यांवर बंदी घालण्यात यावी. जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. तेव्हा स्त्रियांनीदेखील आपल्या संरक्षणाची काळजी ही स्वतःच घेऊन अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे.

           डॉक्टर अलका गोडे,(देऊळगाव मही)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये