Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ किसान मजदूर कॉग्रेस तर्फे स्वातंत्रदिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे इंदिरा गांधी किसान मजदूर कॉग्रेस भवन चंद्रपूर येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी विदर्भ किसान मजदूर कॉग्रेसच्या वतीने ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्य माजी खासदार तथा कामगार नेते मा.श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व प्रियदर्शिनी चौक येथे श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले.

देशावर इंग्रजांनी तब्बल दीडसे वर्ष राज्य केले. इंग्रजांच्या गुलामगिरीतुन देशाला स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधी यांच्यासह अनेक थोर महापुरुषांनी त्याग बलिदान दिले. त्या त्यागातुन देश स्वंतत्र झाला. देशाला उभे करण्यात भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशात विकासाची सुरुवात केली.

आज ७८ वर्षात आम्ही एक मजबूत भारत, आझाद भारत, धर्मनिरपेक्ष भारत, म्हणून आम्ही पाहत आहो. देशाची सिमा सुरक्षा आमचे सैनिक साभाळात आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागाची सुरक्षा आमचे पोलिस दल साभाळत आहे. आज देश विकासाचा प्रगतिपथावर पुढे जात आहे. यांच श्रेय ७८ वर्षात आमच्या पूर्वजनांची मेहनत व दुरदृष्टी आहे. जे केंद्रात व राज्यात सत्तेत होते त्यांनी शहरी व ग्रमिण भागात विकासची कामे केली म्हणून आज देश विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर दिसत आहे. आज काही जातीयवादी शक्ती देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे. अशा जातीयवाद शक्तींना धडा शिकविण्याचे काम आपल्याला करावे लागेल व एक मजबूत भारत, अखंड भारत, धर्मनिरपेक्ष भारत राखण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तिरंगा आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे.

याप्रसंगी विदर्भ किसान मजदूर कॉग्रेसचे ग्रामिण अध्यक्ष अॅड. अविनाश ठावरी, जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक अशोक नागापूरे, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, कामगार युनियनचे रामदास वाग्दरकर, विरेंद्र आर्या, अनिल तुगीडवार, गजानन दिवसे, सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करूणाकर, अनंता हुड, रतन शिलावार, अजय महाडोळे, पृथ्वी जगंम, सायरा बानो, निर्मला ठाकुर, अमोल हलदर, निताई घोष, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये