Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय,महात्मा गांधी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी स्कॉलर अकॅडमी,महात्मा गांधी विद्यामंदिर, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 78 व्या स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर चे सचिव श्री धनंजय गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत स्काऊट गाईड व आरएसपी ध्वजाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ च्या सहसचिव श्रीमती उज्वलाताई धोटे, संचालक श्री रामचंद्रजी सोनपितरे, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री शैलेंद्र देव, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापिका सौ स्मिता चिताडे, स्कॉलर अकॅडमीच्या प्राचार्य किरण कुंडू, उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे, उपप्राचार्य श्री प्रफुल माहुरे, पर्यवेक्षक श्री शंकर तुराणकर,पर्यवेक्षिका सौ विना देशमुख हे होते. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक,शिक्षेत्तर कर्मचारी,मोठया प्रमाणात पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री प्रशांत धाबेकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये