Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि. प. प्राथ. शाळा खडकी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी येथे 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

     विद्यार्थी विविध थोर पुरुषांच्या वेशभूषा करून आले होते. काही विद्यार्थ्यांनी आपली भारतीय संस्कृती ची ओळख करून देण्याच्या उद्देशाने पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती.. सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री तुमराम सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिराम किन्नाके यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.ध्वजरोहना साठी उपाध्यक्ष शा. व्य. स. सुनंदा मेश्राम, सदस्य प्रभाकर वेरकडे, दौलत मेश्राम, अरुण कुमरे, सौ अर्चणा पेंदोर, अनुसया किनाके, सोनू तोडसे, पोलीस पाटील संकटराव गेडाम, गावातील जेष्ठ नागरिक देवराव तोडसे, भोजू गेडाम हे आवर्जून उपस्थित होते तसेच पारडी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री शंकर तलांडे, श्री गेडाम सर विषय यांनी सुद्धा कार्यक्रमाला आकस्मित भेट दिली, विदयार्थ्यांची भाषणे घेण्यात आली.

श्री शत्रुघ्न तुमराम सर मुख्याध्यापक यांनी स्वतंत्र्याचा इतिहास आपल्या भाषणातून स्पष्ट केला. अतिशय मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले मोलाचे सहकार्य बाळ किसन उरवते बापूजी किन्नके, संतोष गेडाम, रामजी मेश्राम, मोरेश्वर गेडाम यांचे लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समरीतकर सर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये