Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय गांधी अनुदान योजनेची बैठक संपन्न

६१४ प्रकरणापैकी ५२७ प्रकरणे मंजूर : ८७ प्रकरणे प्रलंबित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           संजय गांधी अनुदान योजनेची बैठक ९ ऑगस्टला समितीचे अध्यक्ष विजय वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेचे कामकाज सचिव नायब तहसीलदार पठाण यांनी पाहिले. या सभेत विविध योजनेतील एकूण ६१४ प्रकरनापैकी ५२७ प्रकरणे मंजूर करण्यात आली तर ८७ प्रकरणे त्रुटीमध्ये ठेवण्यात आली आहे.

   या सभेला उपस्थित सदस्य नगर परिषदेचे प्रतिनिधी विनोद पांढरे, विशाल ठेंगणे, दिनेश कोल्हटकर, प्रदीप देवतळे, अव्वल कारकून गजानन ढोबळे यांनी पाहिले.

सभेत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे प्राप्त झालेले सर्व अर्ज छाननी करीता व मंजूर , नामंजूर करण्याकरिता सभेमध्ये ठेवण्यात आले होते. एकूण प्राप्त अर्ज ६१४ पैकी संजय गांधी योजनेची १३५ अर्ज प्राप्त झाले, इंदिरा गांधी विधवा योजनेत २६ अर्ज, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेत १४२ असे अर्ज प्राप्त झाले असता श्रावण बाळ या योजनेतील २ अर्ज नामंजूर करण्यात आले. त्याचे कारण पडताळणीमध्ये वैद्यकीय दाखल्या मध्ये २८ टक्के दिव्यांग आढळल्याने ते अर्ज अपात्र ठरविण्यात आले. तसेच संजय गांधी योजना दिव्यांग मध्ये १ अर्ज नामंजूर करण्यात आला. दिव्यांगाच्या प्रमाणपत्रावर फक्त ३०टक्क्याचा उल्लेख दिसून आल्याने हा अर्ज समितीने ना मंजूर केला.

तर तिसऱ्या त्रुटीतील एकूण प्रकरणापैकी 87 प्रकरणे त्रुटीमध्ये काढण्यात आले. असून संबंधित लाभार्थ्यांना चुकीची पूर्तता करण्यास सभाध्यक्ष विजय वानखेडे यांनी सूचना केली. लाभार्थ्याने नवीन अर्ज करताना मोबाईल नंबरचा आवर्जून उल्लेख करावा जेणेकरून त्रुटीची पूर्तता करण्यासाठी लाभार्थ्यांना थेट फोन द्वारे त्रूटी संदर्भात कळविण्यात येईल. सभा अध्यक्ष विजय वानखेडे यांनी तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा व कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संजय गांधी योजनेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांच्याशी थेट संपर्क करावा. तसेच या योजनेच्या संदर्भात दलाला पासून सावध राहून कोणालाही एक रुपया न देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. सभेचे आभार प्रदर्शन अव्वल कारकून गजानन ढोबळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये