Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसील ग्राउंड वरील स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमाची प्रथा खंडित होणार का ?

ब्रम्हपुरीतील नागरिकांमध्ये चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरील शहरातील इंग्रजांच्या काळातील तहसील कार्यालयाची इमारत ही ब्रम्हपुरी च्या सौंदर्यात भर टाकणारी एक जुनी ईमारत होती.

तिच्या भव्य अशा मैदानावर दरवर्षी स्वातंत्र्य दिनी सर्व शाळांचे विद्यार्थी, गावातील जेष्ठ नागरिक, पोलिस, एन सी सी कॅडेट,गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम व्हायचा.

तसेच दर वर्षी प्रजासत्ताक दिनी सर्व शाळांच्या चमू विविध कला, झाक्या, मनोरे नृत्य सादर करायचे.

गावातील लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तो एक आनंदाचा क्षण, उत्सव असायचा.

या प्रसंगी ईथे परिसरात अनेक राष्ट्रीय झेंडे, फूगे, खेळण्या यांची दूकाने, फूड स्टॉल लागायचे.पोलिस परेड , एन सी सी परेड यांच संचालन व्हायचं. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हायचा.

व सर्वांच्या साक्षीने ईथे मोठ्या थाटात मान उप विभागीय अधिकारी यांचे हस्ते ध्वजारोहण व्हायचा.परंतू काळानुरुप ही ईमारत जीर्ण झाली होती ती पाडून आता नवीन भव्यदिव्य ईमारत बांधण्यात आली परंतू या इमारतीच्या बांधकामाच नियोजन करतांना एक चूक झाली आहे ती म्हणजे जुन्या ईमारतीला जेवढा प्रशस्त मैदान होता तो कायम न ठेवता तिथे मोठे रूंद सिमेंट चे रस्ते व बगीचा तयार करण्यात आला आहे .

त्यामुळे स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी आता ईथे इतक्या शाळांचे विद्यार्थी, पोलीस , एन सी सी कॅडेट, गणमान्य व्यक्ती यांच्याकरिता जागाच शिल्लक राहिलेली नाही.

त्यामुळे यावर्षी पासून या तहसील ग्राउंड वर होणारा सामुहिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल किंवा नाही हि शंकाच आहे आणि होऊच शकणार नाही कारण तेवढी जागाच आता शिल्लक ठेवलेली नाही.

नवीन ईमारतीचा आराखडा तयार करतांना वरीष्ठ अधिकारी व मुख्य अभियंत्यांच्या ही गोष्ट लक्षात का आली नाही याचच आश्चर्य वाटते.

त्यामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेली ही तहसील कार्यालयाच्या मैदानात होणारी सामुहिक ध्वजारोहणाची प्रथा यावर्षी पासून बंद पडण्याची शक्यता दिसत आहे व ब्रम्हपुरी च्या लोकांना या दिवशी जी अनेक कार्यक्रमाची मेजवानी मिळायची, आनंद मिळायचा त्यापासून पुढे आता ते वंचित राहतील का ? की उपविभागीय अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतील का या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये