Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

चंद्रपुरात पुन्हा गोळीबार – भर दुपारी हॉटेल मधे गोळ्या झाडून हत्या

नकोडा येथिल माजी उपसरपंच हाजी सरवर ह्यांच्यावर गोळीबार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

वारंवार होणाऱ्या गोळीबाराच्या घटणांनी चंद्रपूर जिल्हा राज्यातील गुन्हेगारीचे केंद्रस्थान म्हणून नावारूपाला येत असुन चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा येथिल गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या गडचांदुर येथे कापड दुकानात ठेवलेल्या बॉम्ब सदृष्य वस्तुमुळे दहशतीच्या घटनांमधून सावरण्याचा आताच पुन्हा एकदा चंद्रपूर शहरात भर दुपारी हॉटेलमधे गोळीबार करून घुग्गुस जवळील नकोडाचे माजी उपसरपंच हाजी सरवर ह्यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार कुप्रसिध्द असलेले माजी उपसरपंच हाजी सरवर ह्यंचेवर अनेक गुन्हे दाखल असुन काही दिवसांपूर्वीच त्यांची कारागृहातून सुटका झाली होती. जिल्ह्यातील कोळसा तस्करीत त्यांच्या नावाचा दबदबा होता. मात्र आज दुपारच्या सुमारास हाजी सरवर हे बिनबा गेट परिसरातील शाही दरबार ह्या हॉटेल मधे जेवण करण्यास गेले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. ह्यावेळी त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जागीच ठार केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असुन गोळीबाराची घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये