Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षपदी सुरेश जिल्लेवार तर मानद सचिवपदी कॉष्ट्राईब कर्म.कल्याण महासंघाचे सुनील खंडाळे यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 जि.प.प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या.सावली ची निवडणूक दि. १४ जुलै २०२४ ला पार पडली.अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत तीन पॅनल नी आपापले उमेदवार उभे केलेले होते. परंतु यापैकी म.रा.कॉष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ व म.रा.प्राथमिक शिक्षक संघ व इतर समविचारी संघटनाप्रणित “परिवर्तन पॅनल” च्या उमेदवारांना मतदारांनी विजयाचा कौल दिला.त्यात आदेश मानकर,सुनील खंडाळे,विजय बावणे हे कॉष्ट्राईबचे तीन तर सुरेश जिल्हेवार,भक्तदास कांबळे, लक्ष्मण सोयाम, चंदन बिलवणे,स्वप्निल डोईजड,रजनी रामगिरवार हे महाराष्ट्र संघाचे सहा उमेदवार निवडून आले.

      जि.प.प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सदर निवडून येणाऱ्या उमेदवारांचा पद्ग्रहन समारंभ आयोजित करण्यात आलेला होता.त्यात संस्थेचे अध्यक्ष म्हणून म.रा.प्राथमिक शिक्षक संघाचे सुरेश जिल्हेवार,उपाध्यक्ष भक्तदास कांबळे,तर मानद सचिव म्हणून कॉष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे सुनील खंडाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

   या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष अरुण खराते, रत्नमाला गेडाम,जगदीप दुधे,भास्कर रामटेके,सुनील निमगडे, संदेश मानकर,संतोष सिडाम,अशोक गावंडे,आकाश कुकुडकर,अतिष उराडे, उमेश कुकुडकर, गोविंदा सोनटक्के, सचिन रामटेके, उत्तम गोवर्धन,किशोर लाडे, बाबाराव मेश्राम, धर्मपाल लाडे, प्रवीण येरमे, दिपक कुळमेथे,बबन दुर्गे, शिलवंत रामटेके,गौतम भैसारे,संजय गुरनुले, बबिता बोबडे,विद्या कोसे,ज्योती निमगडे,डॅनिअल देवगडे, संगिता निमसरकार, रंजन नागदेवते, अविनाश रामटेके, निलिमा शेंडे,राजश्री बेदरे, शीतल कन्नावार,शिला गेडाम, पार्वती रामटेके, भावना इंदोरकर यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये