Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. किशोर जोरगेवार ह्यांची लवकरच घरवापासी? – चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या उपस्थितीत परतणार भाजपात?

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पक्षाचे जुने नेते तसेच आताचे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार पुन्हा एकदा आपल्या राजकीय स्वगृही म्हणजेच भाजप मधे परतणार असुन आगामी विधानसभा निवडणुक ते कमळ चिन्हावर लढवणार असल्याची जोरदार चर्चा चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आ. किशोर जोरगेवार हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते असुन त्यांची राजकीय जडणघडण भारतीय जनता पक्षात झाली मात्र चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती करिता राखीव झाल्यानंतर किशोर जोरगेवार व राजेंद्र मुन ह्यांच्यात तिकिटासाठी प्रचंड रस्सीखेच झाली. माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर ह्यांचे समर्थक असलेले राजेंद्र मुन व जिल्ह्याचे पालकमंत्री व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार सुधिर मुनगंटीवार ह्यांचे राजकीय शिष्य असलेले किशोर जोरगेवार यांच्यापैकी कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याने पक्षाने नाना शामकुळे ह्यांच्या रूपाने बाहेरील उमेदवार चंद्रपूरकरांवर लादून निवडूनही आणले.

पुढे सुधिर मुनगंटीवार ह्यांचेशी बिनासल्याने तसेच पक्षात राजकीय भवितव्य धुसर होत असल्याने सुरुवातीपासूनच महत्वाकांक्षी असलेल्या किशोर जोरगेवार ह्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तिथेही त्यांचे बस्तान न बसल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली मात्र अखेरच्या क्षणी काँग्रेस पक्षाने त्यांना डावलल्याने त्यांनी अपक्ष निवडणुक लढविली.

मागील 2019 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी यंग चांदा ब्रिगेड नामक संघटना स्थापन करून क्षेत्रात आपला जम बसविला व 2019 मधे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तत्कालीन आमदार नाना शामकुळे ह्यांचा पराभव करून विजय प्राप्त केला. राज्यात महविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी आघाडीला पाठिंबा दिला मात्र एकनाथ शिंदे ह्यांनी केलेल्या उठावा दरम्यान त्यांनी शिंदेंच्या समर्थनार्थ भुमिका घेत थेट गुवाहाटी गाठले व त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या सोबत राहिले. ह्याप्रकारे 2019 पासुन ते सतत सत्तेच्या सानिध्यात आहेत हे विशेष.

आमदार झाल्यानंतरही पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांच्याशी त्यांचे राजकीय हेवेदावे कायम असल्याचे वारंवार दिसत होते मात्र लोकसभा निवडणुकीत शेवटच्या घडीला दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई घडुन आली व आ. किशोर जोरगेवार ह्यांनी यंग चांदा ब्रिगेड चा महावेलावा घेऊन भाजपचे उमेदवार आ. सुधिर मुनगंटीवार ह्यांना पाठिंबा जाहीर करून चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. ह्या मेळाव्यात आ. किशोर जोरगेवार ह्यांनी सुधिर मुनगंटीवार हे आपले राजकीय गुरू असुन ते आपल्याला मोठ्या भावासारखे असल्याचे जाहीरपणे वक्तव्य केल्याने ह्या दोन्ही नेत्यांमधील दुरावा कमी होतोय असा अंदाज राजकीय वर्तुळात लावल्या जात होता.

अशातच आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असुन पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्यांच्याशी झालेली दिलजमाई, राजकीय संकेत तरच पूर्वीपासून असलेला भाजपचा पिंड ह्यामुळे आ. किशोर जोरगेवार पुन्हा एकदा भाजापात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असुन लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या उपस्थितीत ते कमळ हाती घेणार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये