ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत भाजपचा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न

आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा ओघ; पाच नगरसेवकांसह दोनशे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- भारतीय जनता पार्टीच्या जिवती तालुका शाखेच्या वतीने २३ मे २०२५ रोजी जिवती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींसह सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या सोहळ्यासाठी तालुक्यातील नागरिक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार देवराव भोंगळे यांनी सर्व नवप्रवेशितांचे भाजपच्या दुपट्ट्याने स्वागत करत पक्ष परिवारात त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. येत्या काळात या सर्वांच्या सहकार्याने जिवती तालुक्याचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करू.” त्यांनी नवप्रवेशितांच्या समावेशाने पक्षाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

              या सोहळ्यात काँग्रेसचे विधानसभा महासचिव व माजी उपनगराध्यक्ष अशपाक शेख, नगरसेवक शामराव गेडाम, नगरसेविका अहिल्या चव्हाण, अनुसया राठोड, लियाकतबी शेख, अश्विनी गुरमे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष डसाने, देवलागुडा येथील सरपंच सुनिता किशन जाधव, माजी नगरसेवक शरद चव्हाण, चालक युनियनचे अध्यक्ष प्रवीण राठोड यांच्यासह केशव चव्हाण, नामदेव राठोड, वैजनाथ कदम, शिवाजी कासले, विष्णू मुसने, भानुदास येचवाड, श्रीनिवास राठोड, शिवाजी पवार, प्रल्हाद राठोड, विष्णू घोगरे, मोहन जाधव, देविदास आडे, जनार्धन गेडाम, मनोहर कन्नाके, सुनील सिडाम, गोविंद आक्रुवे, सुभाष पवार, संतोष जाधव, शेषराव चव्हाण, गणपत मेश्राम, रवी चव्हाण, कौशल्या गेडाम यांनी भाजपात प्रवेश केला.

या सर्वांनी आमदार भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जिवतीच्या विकासासाठी भाजपसोबत काम करण्याची इच्छा दर्शवली.यावेळी या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, शहराध्यक्ष राजेश राठोड, गोविंद टोकरे, भिमराव पवार, सुनील मडावी, गोपीनाथ चव्हाण, पुरुषोत्तम भोंगळे, बापुराव मडावी, अंबादास कंचकटले, दिगंबर आंबटवाड, आनंद कदम, पुंडलिक गिरमाजी, पुष्पा सोयम, चेतना राठोड, सुभोध चिकटे, बालाजी माने, सांबा शिंदे, संग्राम बाजगीर, बालाजी बिरजदार, साहेबराव राठोड, राज बेल्लाळे, रामेश्वर सबुचे, टिकाराम राठोड, गोवर्धन चव्हाण, संतोष राठोड, उखंडराव चव्हाण, मोकिंद राठोड, कमलाकर जाधव, संभाजी रायवाड, बाळू ठोंबरे, रवी जेवले, कपिल राठोड, विकास सोनकांबळे, शिवाजी बोइनवाड, राहुल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि जिवतीकर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये