Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यावर आर्वी पोलिसांची कारवाई

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 04/08/2024 रोजी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वर आर्वी पोलिसांनी कारवाई करत त्यांचे ताब्यातून दोन मोटरसायकल वं गावठी मोहा दारू सह एकूण 1,82’800रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे

 मौजा छिंदवाडी कडून आर्वी कडे मोटर सायकलने गावठी मोहा दारूची वाहतूक होत असल्याबाबत मुखबीर कडून माहिती मिळाल्यावर बोरगाव हातला चौकआर्वी येथे नाकाबंदी करून प्रो रेड केला असता आरोपी क्रमांक1) शरज जानराव उईके वय 28 वर्ष रा. लहादेवी, आर्वी ता. आर्वी, जिः वर्धा याचे ताब्यातून दोन रबरी ट्यूब मध्ये प्रत्येकी 40 लीटर प्रमाणे एकूण 80 लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर 200 रुपये प्रमाणे 16000 चा व रबरी ट्यूब किंमत 400/₹ एक जुनी वापरते पांढ-या रंगाची टी व्ही एस मोपेड गाडी क्र MH 32 AV 1670 किंमत 80000 रुपये असा जुमला किंमत 96400/₹ चा माल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी क्रमांक 2) वृषभ भाष्करराव बोराडे वय 30 वर्ष रा. मायाबाई वार्ड आर्वी 2) विनोद गणपतराव नेवारे वय 25 वर्ष रा. मायाबाई वार्ड आर्वी मालक 3) भावेश हिरामण पाटील रा आर्वी पसार दारू देणार 4)नरसिंग उर्फ नरु चव्हाण रा.शिदवाडी ता. तिवसा जि. अमरावती पसार यांचे ताब्यातून दोन रबरी ट्युबमध्ये 80 लिटर गावठी मोहा दारु, प्रती लिटर 200/- रु. प्रमाने 16000/- रु. व एक जुनी वापरती बजाचे कंपनीची डिस्कव्हर मोटर सायकल क्रमांक एम.एच.26/ए.बी./5723 किमंत 70000/- रु. व दोन रबरी ट्युब, प्रती ट्युब 200/-रु. प्रमाने 400/-रु. असा जुमला किमंत 86,400/- रू माल अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने वरील आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आलेली आहे

सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री नुरल हसन, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे साहेब, यांचे मार्गदर्शनात माननीय उपविभागीय पोलीस श्री देवराव खंडेराव साहेब, पोलीस निरीक्षक श्री यशवंत सोळसे साहेब यांचे निदर्शनात , पोहवा अमर हजारे, पोहवा रामकिसन कासदेकर, पोहवा दिगंबर रुईकर, नापोशी प्रवीण सदावर्ते पोशी निलेश करडे, स्वप्निल निकुरे, राहुल देशमुख आदींनी केलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये