ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अन्यथा धर्मविर आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील समाधी समोर दलीत आदिवासी ओबीसी तथा गरीब मराठा लोकांचे आंदोलनं

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते देवराव वाटगुरे यांनी मारेगाव तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविले निवेदन

 मारेगाव – दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी शेती साठी अतिक्रमण केले आहे अशा जमिनी नियमानुकुल करण्यासाठी संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संविधनात्मक मार्गाने पाठपुरावा सुरू आहे.

परंतु शासन त्याकडे अक्ष्यम्य प्रमाणात दुर्लक्ष्य करत असल्यामुळे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संघटनेचे जेष्ठ नेते देवराव वाटगुरे यांनी मारेगाव तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे त्या निवेदनाची दखल न घेतल्यास दि 16 ऑगेस्त 2024 रोजी धर्मविर आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील समाधी समोर आंदोलनं करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री सचिवालय जिल्हा अधिकारी कार्यालय, यवतमाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक यवतमाळ सहित वरिष्ठ पोलिस निरीक्षक टेंभी नाका ठाने मुम्बई याच्या कडे पाठून होऊ घातलेल्या आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अजय मंडपे, शामा दादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे, जिल्हा अध्यक्ष पांडुरंग टेकाम सहित मच्छिंद्रा येथील बिगर सातबारा शेतकरी उपस्थित होते

देवराव वाटगुरे, जेष्ठ नेते बिगर सातबारा शेतकरी संघटना

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये