Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रशासनाने सफाई कामगारांचे प्रकरणं व इतर सोई मध्ये दिरंगाई करु नये : मा. ना. शंभुराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री

मंत्रालय, मुंबई येथे मा.श्री. शंभुराज देसाई, यांचेसोबत अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मंत्रालय बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             सफाई कामगारांना न्याय देण्यासठी प्रशासनाने सफाई कामगारांच्या प्रकरणं व इतर सोई मध्ये दिरंगाई करु नये असे मंत्रालय, मुंबई येथे आयोजीत बैठक मध्ये मा.ना. शंभुराज देसाई, उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिले.

मंगळवार दि.३० जुलै २०२४ रोजी मंत्रालय, मुंबई येथे मा.श्री. शंभुराज देसाई, मंत्री यांच्या दालनात अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित मित्र मा.श्री. गोविंदभाई परमार तसेच संघटनेचे पदाधिकारी यांचेसह बैठक झाली.

मा. मंत्रिमहोदय यांचेसोबत सफाई कर्चाऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यात डॉ बाासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजने नुसार मालकीचे जमिनी सह हक्काचें घरे बांधून देण्यात यावे, लाड पागे जीआर मध्ये अगोदरचे जीआर समाविष्ट करुन अनुसुचित जाती व घाणीशी संबंधीत इतर सर्व जाती असा उल्लेख करुन सुधारित जीआर काढन्यात यावे, असंघटीत सफाई कामगारांसाठी महर्षी वाल्मिकी सुदर्शन समाज असंघटीत सफाई कामगार बोर्ड (समिती) बनविन्यात यावे, केंद्र सरकारच्या वित्त निगमच्या धरतीवर महर्षी वाल्मिकी सुदर्शन समाज आर्थिक विकास महामंडळ बनविणे, सफाई कामगारांना जाती प्रमाणपत्र वास्तव्याची अट रद्द करून सुधारीत जाती प्रमाणपत्र देण्याचा आदेश काढणे, मा. सुप्रिम कोर्टाच्या १९९५ च्या निर्णयानुसार सफाई कामातील ठेकेदारी प्रथा बंद करावी, २००५ पासून जुन्या पेन्शन प्रमाणे लागु करण्यात यावी, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये सफाई कामगार भरती करावे, मशिनरी आल्या तरी सफाई कामगारांना मेन शोअर मध्ये प्रत्यक्ष करावी लागणारी घाणीशी स्वच्छता करत आहे अश्याच्या वारस हक्क म्हणून नौकरी देऊन न्याय देणे, रोजंदारी सफाई कामगार १५ ते २० वर्षे काम केलेल्यांना शासनाचे १९९३ व लाड पागे समिती नियम २४० दिवस या आधारे त्यांना कायम स्वरूपी करण्यात यावे, या सर्व विषयावर मा. मंत्री यांनी संबंधित विभागाच्या अधिकारीला सर्व मुद्यावर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले व महत्वाच्या प्रश्नावर मॉनेटरींग कमिटी व दक्षता कमिटी, अडव्हॉक कमिटी तसेच तक्रार निवारण समिती महाराष्ट्र राज्य सचिव स्तरावर तसेच जिल्हा व तालु‌का विभागात बनविण्यात यावे अशे आदेश दिले तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांना सर्व मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले मंत्रालयात झालेल्या बैठकी मध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. प्रताप निंदाने, श्री.जीतू रोज, श्री.विक्की बडेल, श्री राजेश रेवते, श्री. राजेश टाकेकर, श्री. काशिनाथ जाधव, श्री. रघुनाथ जाधव, आणि महाराष्ट्रतील विविध ठिकाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये