Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुग्णसेवेतून मिळणाऱ्या समाधानाची तुलना नाही – ना. सुधीर मुनगंटीवार

पोंभुर्णा व राजुरा येथील महाआरोग्‍य शिबीराला उपस्थिती

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

माझ्या वाढदिवसानिमीत्‍त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पोंभूर्णा येथे महाआरोग्‍य शिबीराचे आयोजन करून गरीब लोकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत उपलब्‍ध करून दिलेत. या गरीब रूग्‍णांची सेवा करण्यात जे समाधान आहे त्याची कधीही तुलना होऊ शकत नाही, असे महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पोंभूर्णा येथे विविध आजारांवर मोफत उपचार करण्‍यासाठी महाशिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. यात प्रामुख्‍याने नेत्ररोग, स्‍त्रीरोग, बालरोग, नाक, कान, घश्‍याशी संबंधित आजार, अस्‍थीरोग, त्‍वचारोग यांचा प्रामुख्‍याने समावेश आहे. या सर्व आजारांवर या महाआरोग्‍य शिबीरात मोफत उपचार करून मिळणार आहेत. ना. मुनगंटीवार म्‍हणाले, ‘समाजात अनेक संस्‍था आपल्‍याला मदत करण्‍यात तत्‍पर असतात. अश्‍या संस्‍थांच्‍या माध्‍यमातून आपण गरीब रूग्‍णांवर उपचार करू शकतो. यासर्व संस्‍थांचा मी आजन्‍म ऋणी राहील. याप्रसंगी जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांचेही शुभेच्‍छापर मार्गदर्शन लाभले.

या महाआरोग्‍य शिबीरात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर जिल्‍हा, सामान्‍य रूग्‍णालय चंद्रपूर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्‍णालय सावंगी मेघे, एच.सी.जी. कॅन्‍सर हॉस्‍पीटल नागपूर, अमेरिकन ऑकॉलॉजीकल इंस्‍टीट्यूट, नागपूर लता मंगेशकर हॉस्‍पीटल हिंगणा, शालीनीताई मेघे हॉस्‍पीटल अॅन्‍ड रिसर्च सेंटर वाणाडोंगरी नागपूर, ग्रामीण रूग्‍णालय पोंभुर्णा, आय.डी.ए. चंद्रपूर, जिल्‍हा केमिस्‍ट अॅन्‍ड ड्रगिस्‍ट असोसिएशन, चंद्रपूर यांचे सहकार्य लाभले.

यावेळी मंचावर जिल्‍हाधिकारी विनय गौडा, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन , जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. कटरे, उपविभागीय अधिकारी स्‍नेहल रहाटे, तहसिलदार, नगर परिषदेचे मुख्‍याधिकारी, डॉ. रवि आलुरवार, डॉ. सुशिल मुंधडा, डॉ. प्रविण पंत, डॉ. सुशिल बोगावार, माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

राजुरा येथे महाआरोग्य शिबीर

राजुरा येथेही महाआरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. अनेक रूग्‍णांनी याचा लाभ घेतला. या दोन्‍ही कार्यक्रमांचे आयोजन राजुरा विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा भाजपाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे व भाजपाच्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी केले होते. या दोन्‍ही ठिकाणी देवराव भोंगळे यांचेही मार्गदर्शन झाले.

स्‍व. काशीनाथ टेकाम यांच्‍या कुटूंबियांना सानुग्रह निधी प्रदान

बल्‍लारपूर तालुक्‍यातील मौजा दहेली येथे श्री. महादेव नानाजी भोयर यांच्‍या शेतामध्‍ये काम करत असलेले मजूर काशीनाथ सोमा टेकाम यांचे पुरात बुडून मरण पावल्‍याचे निदर्शनास आले असता गावकऱ्यांनी त्‍यांना मृत अवस्‍थेत बाहेर काढले. त्‍यांच्‍या मृत्‍युपश्‍चात त्‍यांच्‍या पत्‍नी सिंधुबाई काशीनाथ टेकाम व मुलगा सुनिल काशीनाथ टेकाम यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते ४ लाख रूपयांचा सानुग्रह निधी प्रदान करण्‍यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन प्रामुख्‍याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये