Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांच्या घटनाविरोधी अटकेच्या निषेधार्थ वर्धेकरांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

   चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       वर्धा आम आदमी पार्टी व इंडिया आघाडी च्या वतीने केंद्र सरकार च्या दडपशाहीचा विरोधात निदर्शन व निवेदन वर्धा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

यावेळी सरकारला निवेदनाच्या तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यात आम आदमी पार्टी किसान अधिकार अभियान,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ,राष्ट्रवादी कॉग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी शिवसेना,संभाजी ब्रिगेड आदिवासी कृती समिती रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, व समस्त इंडिया आघाडी चे घटक दल आदिंचे नेते सहभागी होते

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून केंद्र सरकारने मुख्यतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जबरदस्तीने लोकशाही संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून अडकवलेले आहे . त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार सुरू आहे . अनेक आजारांनी ग्रषित असलेले अरविंद केजरीवाल यांना तुरुंगामध्ये अनेक प्रकारचे त्रास देण्यात येत आहे.

 देशभरातील जनता हे सगळं पाहत आहे. केंद्र सरकारचा ही जी वागणूक आहे ती अत्यंत अमानुष आहे. आणि या सरकारने हुकूमशाही पद्धतीने संस्थांचा वापर करणं हा कोणत्याही देशांमध्ये कोणत्याही लोकशाही देशांमध्ये मान्य केल्या जाऊ शकत नाही

 आज देशभरामध्ये या चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर सरकार चालवत असल्याने नरेंद्र मोदी व अमित शहा चा निषेध व्यक्त करत आहे. वर्ध्यातही अशाच प्रकारचा जाहीर निषेध आम आदमी पार्टी व समस्त इंडिया आघाडी च्या वतीने करण्यात आला.

 महात्मा गांधींजींच्या पुतळ्यासमोर पहिल्यांदा जाहीर निषेध करून मग जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन पाठवण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . यामध्ये आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते प्रमोद भोमले, मंगेश ‌शेंडे, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे उपाध्यक्ष विठ्ठल झाडे, सचिव प्रफुल कुकडे,भा रा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर काँग्रेसचे नेते शेखर शेंडे डॉ सचिन पावडे सुधीर पांगुळ प्रवीण हिवरे धर्मपाल ताकसांडे अर्चना भोंबले कोपुलवार सुकेशीनी धनवीज राष्ट्रवादी काँग्रेस चे मुन्ना भाऊ झाडे संदीप किटे विनय मून माकपा चे यशवंत भाऊ झाडे, संभाजी ब्रिगेड चे तुषार भाऊ ऊमाळे , शाम भेंडे ,पांडुरंग राऊत , पंकज सत्यकार, मयुर राऊत , प्रमोद भोयर , प्रकाश भोयर, किरण परिसे, सुनिल श्याम डी वाल, गौतम वासे ,अरुण महा बुधे, प्रकाश डोडा नी अविनाश बंडे वार ,आकाश सुखदेवे, तुळसीदास वाघमारे ,शाहरुख पठान प्रदीप न्हाले,नागार्जुन देश मुख, बल्रराज गुप्ता, तारा बाई फुल हार ,प्रमोद भेंडे सुर्या सोन वने,विजय गव्हाणे, राजू देश मुख, भैया जी देश कर,छोटे लाल जी फुल हार, जय भोमले संभाजी ब्रिगेडचे तुषार उमाळे आदिवासी कृती समिती चे सतिश आत्राम नरेंद्र मसराम चंद्रशेखर मडावी तसेच किसान अधिकार अभियानचे कार्यकर्ते उमेश नारांजे पंकज इंगोले गणेश सुरकार गुरुदेव वैरागडे सुरेश लटारे ज्ञानेश्वर ढगे बाळासाहेब मिसाळ एड कपिलरुक्ष गुडघाटे अमोल नारांजे शारदा रोकडे सुनीता आलोने फकीरा वरखडे वैद्यकीय जनजागृती मंच चे सचिन गरपाळ मोहन मिसाळ मंगेश दिवटे मिलिंद मोहोड आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये