ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 चंद्रपूर-वनी-आर्णी लोकसभा मतदार क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन दिनांक नऊ रोज मंगळवारला सकाळी साडेअकरा वाजता शहरातील मुख्य बाजारपेठेत शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे व माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी कार्यालयासमोर वच्छलाताई धानोरकर यांच्या हस्ते जुमलेबाजी तथा महागाई विरोधाची प्रतिकात्मक गुढी उभारण्यात आली. यावेळी शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेसचे जिल्हा महासचिव धनंजय गुंडावर, अमित निब्रड, रमेश मेश्राम, वसंता मानकर, राष्ट्रवादीचे मुनाज शेख, राजू गैनवार, प्रफुल चटकी, प्रशांत काळेष सुरज गावंडे, सरिता सुर, कविता सुफीष लता इंदूरकर,लक्ष्मी पारखी व अन्य मान्यवर उपस्थित होते.महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये