Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्याहाड बुज. येथे दोघांना वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

        सावली तालुक्यातील व्याहाड बूज. येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून नुकतेच दोघांना आर्थिक मदत देण्यात आली.

       मौजा व्याहाड बुज . येथील रमेश तळू निकुरे याच्या पत्नीला बऱ्याच दिवसापासून कॅन्सरने ग्रासले होते. त्यांच्या पत्नीचे उपचार नागपूर येथील मेडिकल कॉलेजला सुरू असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन २ वर्षापूर्वी झाले होते . त्यातला त्यात रमेश निकुरे यांचा एक डोळा निकामी झाला होता. तद्वतच सात ते आठ महिन्यांपूर्वी रमेश निकूरे यांचा दुसराही डोळा निकामी झाला. त्यामुळे त्यांना दोन्ही डोळ्यांनी अंध झाल्यामुळे आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते . ही माहिती व्याहाड बुज. येथील काँग्रेस कार्यकर्ते अनिल गुरनुले यांनी सावली तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे यांच्या करवी आणि स्वतः विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कानावर घातले.

      तसेच स्व. पोर्णिमा मुकरू गुरनुले आणि त्यांचे पती मुकरू गुरनुले हे तेलंगणा राज्यातील एका गावामध्ये १ वर्षापूर्वी कामाला गेले होते.त्या ठिकाणी लोखंडी सळाक उचलताना पौर्णिमा गुरनुले यांचे सळाकीचा स्पर्श इलेक्ट्रिक ताराला लागल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे अपघाती निधन झाले होते . त्यांच्या पश्चात एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी शिक्षण घेत आहेत.

       ही माहिती राज्याचे विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना दिली असता , ! जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले ! तोचि साधू ओळखावा , देव तेथेचि जाणावा !! आणि गोरगरीब जनताच माझे दैवत असे समजून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी स्व .पौर्णिमा गुरनुले यांचे पती मुकरू गुरनुले व त्यांची मुलं यांच्याकडे विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, व्याहाड बुज. येथील काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल गुरनुले, मेहबूब खा पठाण, बालाजी मोटघरे, जयंत संगीडवार, कवडू ठाकूर, रमेश वाढई, मंगेश वाढई, योगेश वाढई, व्याहाड खुर्द येथील माजी सरपंच केशव भरडकर, मोखाळा येथील ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल मशाखेत्री यांच्याहस्ते ही आर्थिक मदत देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये