ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आईडीबीआय बँक बंद

कर्मचारी मुख्यालयी नसल्याने ग्राहकांना मनस्ताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली शहराच्या मुख्यालयी ठिकाणी महाराष्ट्र बँक,वैनगंगा ग्रामीण बँक, सीडीसीसी आणि IDBI बँक ग्राहकांच्या सेवेसाठी स्थापन झालेल्या आहेत.त्यातच हजारो ग्राहक असलेल्या lDBI बँक ही आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बंद अवस्थेत असल्याने हजारो बचत खाते,चालू खाते,मुदत ठेव खाते आणि आवर्ती ठेव खातेदारांना मनस्ताप सहन करावे लागत आहे.

अतिआवश्यक सेवेमध्ये बँक सेवा येत असल्याने बँके मधील कार्यरत कर्मचारी मुख्यालयी राहणे आवश्यक असताना इतरत्र राहून आपली सेवा देतात.संपूर्ण विदर्भात पावसाने कहर केला असून सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच IDBI बँक सावलीचे संपूर्ण कर्मचारी चंद्रपूर आणि नागपूर वरून ये – जा करीत असल्याने आज बँकेचा दरवाजा बंद असल्याने खातेदार आतुरतेने बँक उघडण्याची वाट पाहताना दिसले.

IDBI बँके मध्ये अनेक व्यापारी,शेतकरी,शेतमजूर,कामगारांचे खाते असून शेतीची कामे जोरात सुरू असून शेतकऱ्यांना आज पैशाची नितांत गरज आहे. तसेच व्यापारी वर्गाला सुद्धा रोजच्या आर्थिक व्यवहारासाठी रोख रक्कमेची आवश्यकता असल्याने त्यांचा सुद्धा आज हिरमोड झाला.अशाप्रकारे बँक कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामीण भागातून आलेल्या खातेदारांना आल्या पावली परत जावे लागले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये