गोरजा येथे शेडचे लोकार्पण समारंभ उत्साहात
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष तथा माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची उपस्थिति

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील गोरजा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात स्वर्गीय जगन्नाथ उरकुडे स्मृती प्रित्यर्थ मा. शामसुंदर उरकुडे माजी सरपंच गोरजा यांच्या कडून तुकडोजी भवन येथे लोखंडी शेड ची भेट देण्यात आली. या लोकार्पण समारंभाचे उद्घाटन मा. हंसराजजी अहीर अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी गृहराज्यमंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार करणजी देवतळे वरोरा विधानसभा होते.समारंभाला विशेष अतिथी म्हणून प्रल्हादजी पा. गायकवाड प्रतिष्ठित नागरिक, गोरजा, मा. अनिलजी धानोरकर माजी नगराध्यक्ष, भद्रावती, मा. प्रशांत डाखरे माजी नगरसेवक,मा. अफजलभाई माजी नगरसेवक, भद्रावती,पोलीस पाटील संतोष बल्की,माजी पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील गायकवाड,वैशालीताई शामसुंदर उरकुडे माजी सरपंच, घोडपेठ उपस्थित होते.या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सामुदायिक सहभागामुळे हा सोहळा केवळ लोखंडी शेडपुरता मर्यादित न राहता गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी प्रेरणादायी ठरला.या लोकार्पण सोहळ्यामुळे गोरजा गावात विकासाचा नवा संदेश पोहोचला असून, गावकऱ्यांच्या ऐक्याचे दर्शन घडले.