पावसाचा बेधुंद नाच जिकडे तिकडे पाणीच पाणी
रहदारीचे जवळपास सर्वच प्रमुख मार्ग बंद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मंगेश पोटवार
गेल्या काही दिवसापासून रिमझिम सुरु असलेल्या पावसाने रात्रौपासून मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे रहदारीचे अनेक मार्ग सध्यास्थितीत तरी बंद आहेत.
मुलं तालुक्यात रात्रौपासून मुसळधार पावसाच्या सरी बरसाल्यामुळे मुलं शहरातील अनेक रस्ते जलमय तर काही घरातसुद्धा पाणी घुसले आहे तर काही घराची पडझड सुद्धा झाली आहे.त्यामुळे नागरिकांना याचा फटका बसला आहे. जवळपास 247मिमी पाऊस आल्याचा अंदाज असून अजूनही पाऊस सुरूच आहे. या परिस्थितीमध्ये नगरपरिषद प्रशासनाने पावसामुळे बाधित लोकांना राहण्याची व्यवस्था नगरपरिषद मुलं ने बांधलेल्या नवीन शाळेत केली असून प्रशासन आलेल्या परिस्थितीवर उपाय योजना करताना दिसत आहे.
सोशल मीडिया वर वायरलं झालेल्या व्हिडीओ वरून तर ग्रामीण भागात सुद्धा अनेक गावातील रस्ते जलमय होऊन घरात पाणी घुसल्याचे दिसत आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मूल ते चंद्रपूर मार्ग, गडचिरोली मार्ग ब्रह्मपुरी मार्ग, जाणाळा ते सुशी मार्ग, बोरचांदली गडीसूर्ला गोंडपिपरी मार्ग, मारोडा ते पेडगाव जाणारा मार्ग सततच्या पावसामुळे बंद असल्याची माहिती दिली आहे.या मार्गावरून प्रवास न करण्याच्या सूचना नागरिकांना दिलेल्या आहेत.या सर्व परिस्थितीत नदीकाठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असा इशारा मूल तालुका प्रशासनाने दिला आहे.