Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंबड शहरात जैन मुनी संघाचा भव्य शुभ प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

धर्मनगरी अंबड येथे तमाम सकल जैन समाजाचे पुन्योदया प.पू. भारत गौरव, समाधीसम्राट गणाचार्य श्री 108 विरागसागर जी, गुरुदेवांचे शिष्य प.पू. वात्सल्य शिरोमणी श्रमण श्री 108 विशेष सागर जी महाराज, श्रमण विश्वदक्ष सागर जी आणि क्षु. विश्वोत्तम सागरजी महाराज यांचा भव्य शुभप्रवेश झाला. शिवाजी चौकात सकल जैन समाजाच्या भाविकांनी पु. मुनी संघाचे पाद प्रक्षालन करून भव्य स्वागत करण्यात आले, ठिकठिकाणी जैन व अजैन भाविकांनी मुनी संघाचे स्वागत केले, शिवाजी चौकातून भव्य मिरवणूक प्रारंभ झाली व श्री 1008 महावीर दिगंबर जैन मंदिर येथे पोहोचली.

पू. मुनिश्रीनी महावीर मंदिरातील धर्म सभेला संबोधित करताना , सांगितले की, दिगंबर संत चातुर्मासात विशेष साधना व उपासना करताना समाजाला धार्मिक उपदेश देतात. ४ महिने गुरूंची सेवा करण्याचे सौभाग्य भक्तांना मिळते. अंबडचा जैन समाज विशेष भाग्यवान आहे, माझा चातुर्मास पुसेगावात होणार होता, पण असा मिलाफ घडला की अंबडवासीयांना २८ व्या विशेष पवित्र वर्षयोगाची संधी मिळाली. हा चातुर्मास एका मंदिराचा नसून तिन्ही मंदिरांचा असेल, मुनीश्री म्हणाले की, आम्हाला सल्ला देणारे लोक नव्हे तर, , मदत करणारे लोकांची आवश्यकता असते, आम्ही कमी बोलतो, कामाच बोलतो, आणि काम असणाऱ्या लोकांशी बोलतो. आम्ही व्यक्ति, समाजाच्या हिशोभावर नव्हे तर आगम च्या हिशोबाने चालतो.

महावीर मंदिर, चंद्रप्रभू मंदिरमार्गे मिरवणूक शांतीनाथ मंदिरात पोहोचली. मुनीश्रींच्या सहवासात शांतीधारा पूर्ण झाली. यावेळी गणाचार्य श्री विरागसागर जी गुरुदेव यांच्या फोटो समोर तिन्ही मंदिरांचे विश्वस्त व श्वेतांबर समाजातील लोकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, यावेळी मंगल प्रवेशच्या वेळेस संपूर्ण जैन समाजचे तरुण-तरुणींमध्ये , व वृद्ध लोकांमधे प्रचंड उत्साह व आनंद दिसून आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये