Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे स्टेशन येथे मोबाईल चोराला अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- एका मोबाईल चोराला आरपीएफ बल्लारपूर यांनी पकडुन जीआरपीच्या ताब्यात दिले असून त्याचा कडून १३,००० रुपये चा मोबाईल जप्त केले.

आज दिनांक 17 जुलै रोजी दिनेश अशोक कोंकट्टी वय 25 वर्ष नाकोडा उसगाव जिल्हा, चंद्रपूर हे वेटिंग रूममध्ये असता अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाइल चोरला. त्यामुळे सीसीटीव्ही मधून मिळालेल्या फोटोच्या आधारे सदर मोबाईल चोराला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक एस.के.पाठक आरपीएफ बल्लारशाह व जीआरपी चौकीचे प्रभारी अविनाश नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक तयार करण्यात आले. पथकांनी स्टेशन परिसराची तपासणी केली असता, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित व्यक्ती रेल्वेच्या आवारात फिरताना दिसला, त्याला पकडून आरपीएफ चौकीत आणून चौकशी केली असता, त्याच्या खिशात 13000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आढळून आला. आरोपी लखन सरदार जन्म वय 40 वर्ष रा. ग्रामीण रुग्णालयचे मागे, शांती नगर, बल्लारपूर याला अटक केले. त्याच्या कडून १३,००० रुपये किमतीचा मोबाईल जप्त केले.

सदर कारवाई आरपीएफ चे महिला सहाय्यक उपनिरीक्षक सुशीला वायाम, हवालदार भूपेंद्र बाथरी, शिपाही पवन कुमार, जीआरपी चे मपोशी किर्ती मिश्रा, पोशी राजेंद्र फटिंग, पोशी प्रमोद भिवगडे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये