Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉग्रेस शिबिर संपन्न

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा लाभ घ्या - सय्यद आबिद अली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

           महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषणा करून राज्यातील दोन कोटी चे 40 लाख महिलांना लाभ घेण्यासाठी प्रभावीपणे योजना राज्यभर राबवण्याची सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरपना येथे वसंतराव नाईक विद्यालय या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये परिसरातील 500 महिला लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रासह नोंदणी केली शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये महिला शेतकरी कामगार यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राज्य शासनामार्फत राबविल्या जात असून त्या योजनेची माहिती व्हावी म्हणून शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं

यामध्ये अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एक रुपयात पिक विमा मोफत शिक्षण योजना यशवंतराव चव्हाण घरकुल समूह विकास योजना प्रधानमंत्री आवास योजना सबरी रमाई मोदी आवास योजना यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व लाभ घेण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले शिक्षणामध्ये विद्यार्थिनींना टॅब योजने बद्दल माहिती देण्यात आली शासनाच्याआरोग्य विभागाच्या लाभ घेण्याचं व त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य कार्ड काढण्याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात बचत गटाच्या महिला यांना देखील बचत गटाची नोंदणी स्वस्त धान्य दुकान मिळवण्याच्या पद्धती अनुसूचित जाती जमाती महिला बचत गटाच्या योजना याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव सय्यद आबिद अलीयांनी दिली व शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीमध्ये येत असलेल्या अडचणी कागदपत्राची पूर्तता करण्यामध्ये लोकांना होत असलेला त्रास याबद्दलही उपस्थित त्यांनी चर्चा केली.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या जिल्ह्यातील महिला वंचित राहणार नाही व आमच्या प्रत्येक भगिनींना लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न पाठपुरावा करीत आहे अडचणी जरी असल्या तरी त्याचे उपाय देखील शासन सुलभ पद्धतीने लाभ देण्यासाठी काही अटी शिथिल केलेले आहेत यावेळेस विशेषतः कोलाम पारधी समाजाकडे कागदपत्र उपलब्ध होत नसल्यामुळे तसेच बँकेकडे खाते उघडण्याची व पासबुक घेण्यामध्ये अडचणी असल्याने माननीय पालकमंत्री यांच्याशी संपर्क करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पोस्टामध्ये खाते उघडून देण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही अबिद अली यांनीमाहिती दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज जीवने विनोद जुमडे मोहब्बत खान पठाण शौकत अली विकास टेकाम महादेव पेनदार इत्यादी उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांचे आवश्यक ते कागदपत्र नोंदणी करण्यात येऊन त्यांचे फार्म शिबिरामध्ये भरण्यात आले यावेळी परिसरातील कुसळ कोरपणा कुकूड बोडी धोपटाळा माथा हात लोणी इतर परिसरातीलमहिलांनी लाभ घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये