Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध दारु विक्रेता एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर कारागृह येथे एका वर्षाकरीता स्थानबध्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन रामनगर, जि. वर्धा हद्दीतील अवैद्य दारु विक्रेता आकाश उर्फ चकण उर्फ गोलू अजय मोटघरे, वय ३० वर्ष, रा. सर्कस ग्राऊंड जवळ, रामनगर, वर्धा याचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर, सेवाग्राम रु खरांगणा चे अभिलेखावर सन २०१८ पासून महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अवैधरीत्या दारुची मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातुन तस्करी करुन तिचा पुरवठा करण्याचे एकुण २१ गुन्हे नोंद आहे. तसेच सदर स्वानबध्द इसम याचे विरुध्द कलम ११० (ई) फौजदारी संहिता अन्वये प्रतिबंधक कार्यवाही केली असता त्याने नमुद प्रतिबंधक कार्यवाहोचे उल्लंघन करुन महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये २ गुन्हे केलेले आहेत.

स्थानबध्द आकाश उर्फ चकण उर्फ गोलु अजय मोटघर याच्या कृत्यांमुळे पोलीस स्टेशन रामनगर,सेवाग्राम व खरांगणा अंतर्गत येणाऱ्या परीसरामध्ये सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था भंग होत असल्याने याचेविरुध्द ठाणेदार रामनगर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हाथभट्टीवाले, औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार,धोकादायक व्यक्ती, रेती माफीया व जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा २०१५) अन्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा.पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, वर्धा यांना पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सादर केला होता. सदरहू प्रस्तावाचा मा. जिल्हा दंडाधिकारी यांनी गांभीवाने दखल घेवून अवैध दारु विक्रेता नामे आकाश उर्फ चकण उर्फ गोलू अजय मोटघरे, वय ३० वर्ष, रा. सर्कस प्राऊंड जबळ, रामनगर, वर्धा याचा दिनांक १०.०७.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश जारी केल्याने त्यास नागपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच भविष्यात वर्धा जिल्ह्यातील शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे गुन्हेगार, दारुविक्रेते, रेती माफीया अशा गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुध्द उपरोक्त कायद्यान्वये कठोर प्रभावी कार्यवाही करण्याचे पुनःश्च संकेत मा. जिल्हाधिकारी. वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी दिलेले आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्था.गु.शा. वर्धा, पोलीस निरीक्षक संजय मॅहे पो.स्टे. रामनगर, सफौ. संजय खल्लारकर, गिरीश कोरडे, पोहवा. अमोल आत्राम सर्व नेमणूक स्था.गु.शा. वर्धा. व पोउपनि. दिनेश कांबळे, पोहवा. गजाजन इवनाथे पोलीस स्टेशन रामनगर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये