ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराजगुडा पुलावर कठडे बांधकाम करणार कधी?

कठडे नसलेल्या पुलावरून धोकादायक वाहतूक ; जिवघेणा प्रवास, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

   जिवती तालुक्यातील जिवती-परमडोली रस्त्यावरील महाराजगुडा गावाजवळील नाल्यावर नविन पुलाचे बांधकाम करण्यात आले मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदारांने पुलावर कठड्याचे बांधकाम केले नसल्याने परिसरातील नागरीकांना भर पावसाळ्यात जीवघेणा प्रवास करावा लागत असून अपघात होण्याची शक्यताही बळावली आहे.
        पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून भोयगाव-पाटण-परमडोली राज्य मार्गाचे काम आर.के.चव्हाण कॅन्ट्रक्शन कंपनी मार्फत करण्यात आले. याच मार्गावरील महाराजगुडा गावाजवळील नाल्यावर पावसाळ्यात नाल्याला पुर येऊन संपर्क तुटत असल्याने नविन पुलाचे बांधकाम करण्यात आले मात्र त्यावरील कठडे बांधले नाहीत.रस्ता वळणदार आणि घाटांचा असल्याने या पुलावर बांधकाम करणे आवश्यक असतानाही कंत्राटदारांनी कठड्याच्या बांधकामांकडे दुर्लक्ष केले आहे.
         या संबंधित बाबीकडे विशेष लक्ष देऊन पुलावर कठड्याचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये