41 वर्षीय व्यक्तीचा घरातच आढळला मृतदेह
शहरातील गौतम नगर येथील घटना
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील गौतम नगर येथे एका घरात 41 वर्षीय व्यक्ती मृतावस्थेत आढळला. सदर घटना दिनांक 6 रोज शनिवारला सकाळी दहा वाजता उघडकीस आली. प्रशांत बळीराम सोनटक्के वय 41 वर्षे असे या मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविला. मृत्यूचे कारण मात्र कळू शकले नाही. चंद्रपूर तालुक्यातील कोसारा येथील हा इसम रहिवाशी होता. तो एका बँकेचा अभिकर्ता असून दोन दिवसांपूर्वीच तो भद्रावती येथील गौतम नगर येथे एका घरात किरायाने राहण्यासाठी आला होता.
घटनेच्या दिवशी घरमालकाने उशिरापर्यंत आपला भाडेकरू वेक्ती ऊठला नसल्याने चौकशी केली असता तो मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर घरमालकाने याची माहिती भद्रावती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत आवश्यक ती कारवाई केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.