ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीच्या पंपावरील भेसळयुक्त पेट्रोल विक्रीची तहसीलदाराडे तक्रार 

चौकशी करून दोषींवर कारवाईची वाहनधारकांची तहसीलदारांकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील मालपाणी पेट्रोल पंपांवर मागील अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पेट्रोलची विक्री सुरूच आहे गुरुवारी संध्याकाळी देवलागुडा येथील किशन जाधव यांनी दुचाकीत भरलेल्या पेट्रोलमध्ये पांढऱ्या रंगाचा तेलासारखा चिकट द्रव दिसून आल्याने याबाबत त्यांनी तहसीलदार जिवती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.पेट्रोलपंवर चाललेल्या गैरप्रकारांची योग्य ती चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

     जिवती तालुक्याच्या ठिकाणी पेट्रोल पंपची निर्मिती झाल्याने तालुक्यातील वाहन चालकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु अल्पावधीतच या पेट्रोल पंपावरून भेसळयुक्त पेट्रोलची विक्री करून ग्राहकांची लुटमार केले जात असल्याची ओरड सुरूच आहे.गुरूवारी देवलागुडा येथील किशन जाधव यांनी बजाज प्लसर या दुचाकी वाहनांमध्ये दोनशे विस रूपयांचे पंपावरून पेट्रोल भरले होते.सकाळी कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी दुचाकी काढली मात्र चालूच होतं नव्हती बराच वेळ प्रयत्न करूनही चालू न झाल्याने दुचाकी मोटार सायकल मेकाॅनिककडे दुरुस्ती करिता आणली तिथेही चालू झाली नाही दुचाकी तील पेट्रोलची पाहणी केली त्यावेळी आश्चर्याचा धक्काच बसला चक्क पेट्रोलमध्ये पांढऱ्या रंगाचा तेलासारखा चिकट द्रव्य असल्याचे दिसून आले.मालपाणी पेट्रोल पंपाच्या ग्राहकांना या प्रकाराचा अनुभव सातत्याने येत आहे.भेसळयुक्त पेट्रोलमुळे वाहनातून दूर निघणे,वाहने बंद पडण्याचे प्रकार वाढले असून तालुक्यातील चारचाकी वाहन व दुचाकी वाहन खराब होत असल्याने वाहनचालकांना मनस्तापासह आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे.

याबाबत पेट्रोल पंप मालक यांच्याशी चर्चा केली व बाटलीमध्ये पेट्रोल काढून केमीकलद्वारे व पेपरद्वारे तपासणी करून पेट्रोल योग्य असल्याचे सांगितले मात्र मागील १२ जुन पासून वाहनचालकांकडून होत असलेल्या तक्रारी आणी खराब होत असलेले दुचाकी व चारचाकी वाहन पेट्रोल भेसळीमुळे खराब होत असल्याचे मेकॅनिक सांगत असल्याने या संबंधित प्रकाराची चौकशी करून भेसळयुक्त पेट्रोलची विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप मालकांवर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.

           – पेट्रोलमध्ये कुठल्याच प्रकारची भेसळ केली जात नाही आणि भेसळयुक्त पेट्रोलही विक्री केली जात नाही.वाहने बंद पडण्याचे किंवा धूर फेकण्याचे वेगळे कारण असू शकतात

                – गोपाल मालपाणी, पेट्रोल पंप मालक

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये