ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रविवारी गडचांदूरात मोफत भव्य महाआरोग्य शिबीर

नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे देवराव भोंगळे यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे आयोजन

शहरातील मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी(मेघे) यांच्या संयुक्त आयोजनातून येत्या रविवारी (दि. ३० जून रोजी) स्थानिक स्व. भाऊराव पाटील चटप आश्रमशाळेत भव्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया निःशुल्कपणे करून देण्यात येणार आहेत. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

सदर शिबीर सकाळी ०९ वाजेपासून सुरू होणार असून याठिकाणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथील मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग आणि कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून याठिकाणी सर्व चाचण्या व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शिबीरात येणाऱ्या नागरिकांनी आधारकार्ड व केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड सोबत आणावे. असे आवाहन आयोजक तथा भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये