Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव राजा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 

68 रक्तदात्यानी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अंधारात खितपत पडलेल्या बहुसंख्य समाजाला प्रकाशाचा मार्ग दाखवून त्यांचे जीवन प्रकाशमय करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतीय राज्यघटनेतून सर्व भारतीयांना समान हक्क देऊन स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता प्रस्थापित करणारे एकमेव युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या 68 व्या महाप्रयान अर्थात महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेब यांनी केलेल्या महान उपकाराची जाणीव ठेवत समाजातील गरजू लोकांना काही मदत व्हावी यासाठी देऊळगाव राजा येथील युवा तरुण आकाश कासारे व मित्र मंडळ यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन करत,

बाबासाहेबांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 68 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली.

सर्वदानात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याची जाणून ठेवत अनेक वर्षापासून युवा तरुण आकाश कासारे व त्यांचे सहकारी मित्र मंडळ हे प्रत्येक वर्षी 6 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत असतात.

 त्यांच्या या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा समाज त्यांना मदत करत असतो.

त्यामुळेच या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर वानखेडे, डॉक्टर गुट्टे ,डॉक्टर शिंगणे तसेच या शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरवाडे तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांच्या सोबत समाजातील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या शिबिरात 68 जणांनी रक्तदान केले.

 विशेष म्हणजे रात्रंदिवस समाजाचे रक्षण करणारे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता नरावडे व त्यांच्या सहकारी पोलिस कर्मचारी यांनी सुद्धा रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन करत समाजात एक एक आदर्श निर्माण केला.

सर्व रक्दात्याना प्रमाणपत्र देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये