ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दररोज योगा करणे ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे – डॉ .प्रफुल्ल ताठे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

      येथील गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचलित समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये दिनांक 21 जून 2024 रोजी योग दिनानिमित्त योगा चे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ताठे म्हणेल की,तुमचे मन आणि शरीर टवटवीत वाटण्याची क्षमता योगामध्ये आहे. जे लोक दररोज योगासने करतात त्यांना योगाच्या सत्रानंतर उत्साही वाटते. योग तुम्हाला तुमचे मन पूर्णपणे आराम करण्यास मदत करते. हे तुम्हाला अनावश्यक तणावांवर काम करण्यास मदत करते, त्यामुळे चांगली झोप लागते.

संशोधकांनी असे शोधून काढले आहे की योगाच्या नियमित सरावाने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती वाढणे, स्नायूंची शक्ती सुधारणे आणि रक्तदाब सामान्य करणे यासह अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. योग हा तणावासाठी एक प्रसिद्ध उतारा आहे आणि झोपण्याच्या सुधारित पद्धतींना प्रोत्साहन देतो.

निर्धार नियमित योग करण्याचा आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा योग आपल्याला अशी ऊर्जा देते जी आपण हजारो तास काम करूनही मिळवू शकत नाही योग म्हणजे मनातील चढउतार स्थिर करण्याची प्रक्रिया योगाचा नियमित सराव करा,आयुष्य आनंदी आणि निरोगी करा!आमच्याकडे प्राचीन काळात आरोग्य विमा नव्हता योग आहे आरोग्यासाठी क्रांती तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे तसेच महाविद्यालयाचे डॉक्टर गोपाल कृष्ण सीताफळे, डॉक्टर पी आर लड्डा, प्राध्यापक किशोर चराटे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा सक्रिय सहभाग नोंदवला. संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे, सचिव नंदाताई कायंदे, सहसचिव मनोज भाऊ कायंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेमध्ये असे अनेक मार्गदर्शनपर उपक्रम सतत राबविण्यात येत असतात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये