ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाबलिक बालिकेला फूस लावून केले अपहरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

 दिनांक 21/06/2024 रोजी नियंत्रण कक्ष, लोहमार्ग नागपूर येथुन फोनव्दारे माहिती दिली की, ट्रेन नं 12625 केरला एक्सप्रेसने बालिकेला एक इसम पळवून घेवून जावून राहिला आहे असे कळविले वरून सदरची माहिती पो.शि./612 निकोडे यांना सांगुन नमुद ट्रेन पो शि/ 1203 किर्ती मिश्रा व पो.शि./612 निकोडे, भास्कर ठाकूर, बबिता लोहकरे, चाईल्ड लाईन टीम, सुनील पाठक, निरिक्षक रेल्वे सुरक्षा बलच व यादव साहेब यांचे सह अटेन्ड केली असता रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथील प्लेटफार्म क्र. ३ वर नमुद ट्रेन आल्याने पुढील जनरल कोचमध्ये मिळून आल्याने सदर डिटेन बालिकेस रे.पो. चौकी बल्हारशाह येथे आणुन हजर केले. विचारपूस केली असता बालिकेसंदर्भात पो स्टे. अंबलापुझा केरला येथे FIR दाखल असुन सदरचे पो.स्टे चा पोलीस स्टॉफ तिल ताब्यात घेण्याकरीता येत असुन तिला त्यांचे ताब्यात्त सुपुर्त करणे पर्यंत बाल कल्याण समिती, चंद्रपूर येथे दाखल करणे असल्याने नमुद बालिकेची वैद्यकिय तपासणी करून सदर बालिके विषयी माहिती मा. अजय साखरकर, बाल संरक्षण अधिकारी आणि बाल कल्याण समिती, अध्यक्षा ऍड. क्षमा बासरकार यांना दिली व त्यांच्या मौखिक आदेशाने बालिकेला तात्पुता निवारा करिता सखी वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर येथे ठेवण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये