Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.आर.आय.एल. अवैद्य उत्खनन गावकऱ्यानी वाहन दिले पोलीसांच्या ताब्यात

पकड्डीगडुम कालवा पुन्हा पोखरला ?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

राष्ट्रीय महामार्ग राजुरा गोविंदपुर या मार्गाच्या बांधकामाचा कंत्राट या कंपनीकडे असून गेल्या वर्षा दीड वर्षात कंपनीच्या मजुरीचे व अवैध उत्खननाचे अनेक वाद चर्चेत असताना महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार व जिल्हाधिकारी यांनी टाकून दिलेल्या अटी शर्तीच्या अधीन रात्रच्या अंधारात पोकलेन जेसीबी किंवा उत्खनन करून वाहतूक करण्यास बंदी असताना या कंपनीने गेल्या वर्षभरात 24 तास उत्खनन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बस्तानात बांधले आहे असे चित्र कंपनीच्या कामगिरीवरून जनतेमध्ये चर्चेचा विषय आहे.

अनेक नाले दिशाभूल करणारे पंचनामे चुकीचे उपयोगिता प्रमाणपत्र सीमांकनाचा झोल असं असताना कोरपणा राजुरा तालुक्यातील अनेक नाले मंजूर आदेशापेक्षा अधिक उत्खनन करून शासनाच्या आदेशालाच कंपनीने आव्हान दिले अतिरिक्त उत्खननाचा स्वामित्व धन वसूल करण्याचे व तीस दिवसात त्याबाबतची कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहे परंतु सप्टेंबर 2022 पासून आजतागायत या कंपनीचा अतिरिक उत्खननाचा एक रुपयाही वसूल करण्यात आलेला नाहीमागील वर्षी पकडी गड्डम कालव्याची मंजुरी नसताना संपूर्ण कालवा उत्खनन करून त्या ठिकाणी निघालेला मुरूम दगड रेती रस्ते विकास कामावर वापर करण्यात आली याबाबतची तक्रार होतात पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला व कंपनीने झालेल्या नुकसानी बद्दल उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले सांडव्यावरून वाहणारे ध्वज पाणी वेगाने वाहून जाणार असल्यामुळे प्रतिबंधक भिंत या कंपनीने खोदून टाकली होती.

मात्र आता त्यांनी काही ठिकाणी काम सुरू केले असले तरी ते काम सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याचं गतिरोधक म्हणून उपयोगी पडेल याची खात्री नाही नुकत्याच दोन-चार दिवसापासून पुन्हा त्यांनी उत्खननाची मंजुरी किंवा पाटबंधारे विभागाकडून कोणतेही आदेश नसताना धानोली तांडा गावा लगतच्या कालव्या ला खोदूनत्या ठिकाणचे मुरूम माती रेती रात्रच्या अंधारात वाहतूक करत असल्याने माथा फाटाते धानोली या रस्त्याचे अनेक ठिकाणी खड्डे पडून नासिक झाली आहे व अनेक अपघात होऊन मोटरसायकल धारकांना आपला जीव गमवावा लागत आहे मात्र या कंपनीने संपूर्ण उन्हाळ्यात रस्त्यावरून वाहतूक करून ठिकठिकाणी खड्डे पाडण्याचं काम युद्ध पातळीवर केलं मात्र त्याची दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे कुसळ येथील नागरिकांनी दोन दिवसापूर्वी खिर्डी येथील कंपनीच्या कॅम्प मध्ये निवेदन देऊन लक्ष वेघलेहोतेपरंतु कंपनीने गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर गावकऱ्यांनी दिनांक 20 जून रोजी रात्री अकरा वाजता पकडी गड्डम कालव्यातूनउत्खनन करून वाहतूक होत असलेले वाहन गावकऱ्यांनी वाहन क्रमांक एम एच 48 सीबी 44 69 एम एच 48 सी 06 114 बी आर 37 जी ए 64 47एम एच 48 सि क्यु 6128दगड मुरूम रेती भरलेले वाहन कोरपणा पोलीस स्टेशनच्या समक्ष अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी सदर वाहन पोलीस स्टेशन कार्यालयात लावली असून तहसीलदार कोरपणा हे कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे यावेळी गावातील आबिद अली मोफत तोडासे रामदास पोराते बाबाराव सिडाम अजय पोराते मारुती खापणे अकबर आत्राम हनुमंत पेदोरयांचे सह गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते कुसळ येथील राजगुरू झालेला रस्ता बधार्‍याची दुरुस्तीकोणालात उत्खनन करून ठेवलेले ढिगारे उचल केल्याशिवाय या रस्त्याने वाहतूक होऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे या कंपनीने या भागातील अनेक शासनाच्या मालकीचे बंधारे फोडपाळ करून रस्ता तयार केला असून बोरगाव येथील दोन बंधारे कुसळ गावालगत असलेल्या बोरगाव नाल्यावरील बंधारे फोडून रस्ता तयार केला शासन पाणी अडवा पाणी जिरवा या कार्यक्रमासाठी बंधारे निर्माण करत असताना या कंपनीने बंधारे फोडूनच या कार्यक्रमाला पायदळी तुडवले आहे यामुळे अनेक गावात सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून कॉन्टॅक्ट कंत्राटदार कंपनीने नासगोस केलेल्या सर्व बंदराची दुरुस्त करून द्यावी तसेच पकडी गड्डम जलाशयाच्या कालव्याचे अवैध उत्खनन परवानगी नसताना केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे सामान्य नागरिकांना एक ट्रॅक्टर वाढू देखील चोरीच्या मार्गाने नेल्यास कायद्याचा बडगा उभारणारा महसूल खनि कर्म विभाग मात्र या कंपनीच्या अवैद्य उत्खननाला कारवाई करण्यास का दुर्लक्ष करीत आहे हे एक कोडेच असून या प्रशासनाच्या दिरंगाई व दुर्लक्षपणामुळे खोट्या अवधी रुपयाच्या महसुलाला चुना लागलेला आहे ।गावकऱ्यांनी ताब्यात दिलेले वाहन यावर महसूल व पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते अवैद्य उत्खनन व स्वामित्वधनाचा प्रश्न विधान सभेत गाजणार आहे हे विषेश ताब्यात असलेले वाहन व कालवा उत्खनन प्रकरणात का कार्यवाही होते याकडे तालुक्यातील गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये