Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित योगाची गरज – अतुल कोपुलवार

विश्वशांती विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

   शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे.योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.निरोगी जीवनाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे त्यामुळे गेल्या दशकभरापासून दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो असे योग दिनाप्रसंगी श्री साई योगा ग्रूप चे संचालक अतुल कोपुलवार बोलत होते.

   भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री साई योगा ग्रूप चे अतुलभाऊ कोपुलवार यांचे मार्गदर्शनात सूरज बोम्मावार,गौरव संतोषवार,राकेश विरमलवार,रामचन्द्र तीवाडे,भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ पा.संगिडवार,विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

याप्रसंगी अनुलोम विलोम,कपालभाती,भ्रामरी,प्रणव ध्यान,भद्रासन,वज्रासन,मंडूकासन अशा विविध आसनाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.आयोजित योग दिनासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये