Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेंव्दारा राबविण्यात येणारे योजनादुताचे कार्य कौतुकास्पद – माजी आमदार संजय धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

     केंद्र सरकार तथा राज्य सरकार यांचेव्दारा कार्यान्वित कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) सदैव तत्पर असते,ही बाब कौतुकास्पद असुन जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्याचे योजनादुताचे कार्य रचणाबध्द व प्रबळ आहे.असे मत माजी आमदार संजय धोटे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलतांना व्यक्त केले.अनुलोम व्दारा आयोजीत स्थान मित्र व वस्ती मित्र संगम् कार्यक्रमात ते बोलत होते.

शासनाची कार्यरचणा प्रत्येक भागात वेळेवर पोहोचत नाही,अशावेळी अनुलोम दुत लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहोचवुन त्यांना लाभ मिळवुन देण्याचे जनोपयोगी कार्य करतात.हे सुध्दा स्तुत्य आहे.असे ते म्हणाले.
अनुलोम द्वारा प्रत्येक स्थानांवर स्थान मित्र व वस्ती मित्र नियुक्त असते.जनतेला होणारा नाहक त्रास थांबविने तथा शासनाच्या जनकार्याची आपुर्ती प्रदान करण्याचे मौलिक काम अनुलोम संस्थेव्दारे होते आहे.

जनतेनी आमच्या योजनादुताच्या माध्यमातुन योजणांचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रांत सहविभाग प्रमुख किरण जावके यांनी उद्बोधनात केले.उपविभाग प्रमुख सुनिल दालवनकर यांनी अनुलोम सेवा कार्यावर प्रकाश टाकला.अनुलोमची कार्यरचणा सतिश मुसळे यांनी विशद केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे मार्गदर्शनाखाली ही संस्था संपुर्ण महाराष्ट्रात काम करते आहे. राजुरा,कोरपणा,जिवती,गोंडपिपरी भागातील विविध स्थानांवर समस्यांचे निरासरण संस्थेव्दारा करण्यात आलेले आहेत. यादवराव धोटे महाविद्यालय राजुरा येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजुरा संजय धोटे,प्रमुख पाहुने किरण जावके अनुलोम विदर्भ प्रांत सहविभाग प्रमुख,चंद्रपुर उप-विभाग प्रमुख सुनिल दालवनकर,राजुरा भाग समन्वयक सतिश मुसळे,हटकर समाज प्रभावशाली नेतृत्व माधवराव पोडगिर,बल्लारपुर भाग जनसेवक विपीन भालेराव हे होते.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन वरोरा भाग जनसेवक प्रफुल ढोके यांनी केले. यावेळी राजुरा भागातील विविध स्थानांवरुन ११० पेक्षा जास्त‌ स्थान व वस्ती मित्र,संवादिनी उपस्थित होते.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये