ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दिवसेंदीवस प्रगतीपथावर – संतोषसिंह रावत

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नफयामध्ये दिवसेंदीवस वाढ होत असून कर्जवसुलीमध्ये वाढ होत आहे. तसेच एनपीएचे प्रमाण कमी करण्यांत बँकेला यश आले असून कमी कर्मचारी असून सुध्दा बँक ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करीत असून ग्राहकांचा बँकेवरील विश्वास कायम असल्यामुळेच बँक दिवसेंदीवस प्रगतीपथावर असल्याचे बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी सांगीतले.

कमी कर्मचारी असुन सुध्दा मागील ४ वर्षात बँकेने ठेववाढ, कर्जवसुली, कर्जवाटप एनपीए कमी करणे, बँकेच्या नफयात वाढ, इ. सर्वच क्षेत्रात अविस्मरणीय कामगीरी करून ग्राहकांचा बँकेवर असलेला विश्वास सार्थ ठरविला आहे.

३१ मार्च २०२३ अखेर बँकेच्या ठेवी रु. ३४९७.५० कोटी होत्या. बँकेचे एकुण कर्ज रु. १४७२.०७ कोटी होते व कर्जवसुली ४२.३९% होती. त्यात लक्षणीय वाढ होउन ३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या ठेवी रु. ३६७४.६६ कोटी, कर्जबाकी रु. १५६०.६६ कोटी व कर्जवसुलीचे प्रमाण ४२.४८% आहे. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचा सकल एनपीए १२.८२% व निव्वळ एनपीए ३.१७% आहे. व सकल नफा रू. ९२.०५ कोटी असून निव्वळ नफा रु. २५. ९१ कोटी झालेला आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी व सामान्याची बँक म्हणुन ओळखली जाते. मागील वर्षी शेतकरी बांधवांना ६७४ कोटीचे पिक कर्जवाटप करून जिल्हयातील राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांमध्ये प्रथम कमांकावर आहे. व यावर्षी सुध्दा लिड बँकेकडुन पिक कर्जवाटपाकरीता रू. ७११ कोटीचे लक्षांक देण्यांत आले असून आतापावेतो ६३४५६ शेतकरी बांधवांना रू. ६१६ कोटीचे कर्जवाटप केले असून लक्षांकाच्या ८६.६१% कर्जवाटप करून यावर्षीही बँक पिक कर्जवाटपात अग्रेसर असून प्रथम कमांकावर आहे.

महीला बचत गटांना कर्जवाटप करण्यास सुध्दा इतर बँकांच्या तुलनेत अग्रेसर आहे. बँकेला संलग्न २८६२० बचत गट असून मागील वर्षी ६५८८ बचत गटांना १३० कोटीचे कर्जवाटप करण्यांत आले व बचत गटाची कर्जवसुली ९०% असून यावर्षी माहे एप्रिल व मे या २ महीण्यांत ७१२ बचत गटांना १९ कोटी कर्जवाटप करण्यांत आलेले आहे.

मागील २ वर्षापासुन संलंग्न सहकारी संस्थांना लाभांष देण्यांत येत आहे. सन २०२२ मध्ये ४% व सन २०२३ मध्ये ५% याप्रमाणे लाभांष देण्यांत आला व यावर्षी सुध्दा ५ ते ६% लाभांष देण्याचा बॅकेचा मानस आहे.

राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधुन प्रथम ५ यशस्वी बँकांमध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव आहे. व बँक दिवसागणीक उत्तमोत्तम कार्य करून प्रगतीपथावर आहे. यानंतर सुध्दा बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, बँकेचे संचालक मंडळ व कर्मचारी व इतर सर्वांचे सहकार्याने बँकेला राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सर्वोच्च शिखरावर नेण्याचा मानस बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी बोलुन दाखविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये