Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरोधी पक्षनते वडेट्टीवारांच्या आश्वासनानंतर सरपंचाचे उपोषण मागे

चौकशी करून कारवाईचे आदेश - गावगुंडांच्या त्रासाने पत्करला उपोषणाचा मार्ग

चांदा ब्लास्ट
सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप बाबुराव ठाकरे यांनी गावगुंडाकडून ग्रामपंचायतीच्या कचरा कुंड्या मालमत्तेची तोडफोड, वारंवार धमक्या व झालेले हल्ले या विरोधात पोलिसात तसेच पंचायत समिती स्तरावर लिखित तक्रार देऊ नये कारवाई न झाल्याने दि.12 जून पासून आमरण उपोषण सुरू केले. याची माहिती मिळताच आज मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना तात्काळ चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. सदर आश्वासनानंतर सरपंच ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते नींबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
आपले गाव स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी राहावे याकरिता सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप ठाकरे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत गावात कचराकुंड्या तयार केल्या. मात्र गावातील काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड केली. सोबतच गावातील मुख्य पानंद रस्त्यावरुन वाळू वाहतूक करणारे अवजड वाहने जाऊन रस्त्याची दुर्दशा करण्यात आली. तरी या विरोधात आवाज उठवणाऱ्या सरपंच संदीप ठाकरे यांचे वर सलग दोनदा हल्ला झाला. याची वारंवार तक्रार पंचायत समिती स्तरावर तसेच पोलिसात देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने व गाव गुंडांकडून जीविताचा संभावित असल्याने अखेर न्यायासाठी सरपंच ठाकरे यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. त्यांनी कालपासून सिंदेवाही पंचायत समिती तथा तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केले. याची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मतदार संघातील दौरा दरम्यान थेट उपोषण मंडपाला भेट दिली व सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत सदर मागण्यांची सखोल चौकशी करून खड्डेमय मार्गांची दुरुस्ती, व संपूर्ण मागण्यांची पूर्तता करावी असे वेळीच निर्देश दिले. यावर समाधान व्यक्त करीत मरेगाव (तुकुम )सरपंच संदीप ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या आश्वासनानंतर उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.
याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही तहसीलदार पानमंद, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, पंचायत समिती विभागाचे अधिकारी, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, तालुका सरपंच संघटना अध्यक्ष राहुल बोडने, कृउबा संचालक नरेंद्र भैसारे, जानकीराम वाघमारे, सचिन नाडमवार व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये