चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी देशभरात सुरू असुन राज्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मतमोजणी सुरू झाली असुन जसजशी मतमोजणी पुढे जात आहे तसतशी प्रतिभा धानोरकरांची आघाडी सातत्याने वाढत असुन प्रत्येक फेरीत त्यांनी आघाडी घेतली आहे.
दुपारी 1 वाजेपर्यंत झालेल्या फेऱ्यांत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ह्यांनी भाजपचे उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार ह्याच्यावर 1 लाख 1 हजार 179 मतांची आघाडी घेतली आहे.
उमेदवार निहाय प्राप्त मतांची संख्या
कांग्रेस प्रतिभा धानोरकर 2 लाख 55 हजार 453, भाजप सुधीर मुनगंटीवार 1 लाख 54 हजार 274, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले 6 हजार 967



