Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एम.ई.सी.बी.चे ईलेक्ट्रीक लोखंडी पोल चोरी करणारी टोळी अटकेत

ट्रॅक्टर, मिनी डोर अॅटो व २८ लोखंडी ईलेक्ट्रीक पोल सह एकुण १२ लाख ३७ हजाराचा चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन खंरागण येथे फिर्यादी नामे श्री. वैभव सुरेशराव वाट, वय ३९ वर्ष, रा. जुनी वस्ती – बडनेरा जि. अमरावती यांनी लेखी तकार दिली की, ते किशोर ईन्फ्रास्टचर प्राव्हेट लीमीटेड हैद्राबाद या कंम्पनीमध्ये जुनीअर इंजीनीअर म्हणुन नौकरी करीत असुन सदर कंम्पनीचे ११ के.व्ही. चे एम.ई.सी.बी. तर्फे ईलेक्ट्रीक पोल उभारण्याचे काम मौजा मजरा ता. आर्वी जि. वर्धा परीसरात सुरु असुन त्या करीता लागणारे ईलेक्ट्रीक साहीत्य लोखंडी पोल रोडचे लगत ठेवुन असलेले दिनांक २७/०५/२०२४ रोजी रात्रदरम्याण मी व माझे सहकारी नेहमी प्रमाणे कामावरील साईड चेकिंग करीता गेलो असता मौजा मजरा गावाजवळील रोड लगत ठेवुन असलेले लोखंडी पोल १) १४ नग ईलेक्ट्रीक पोल १० मीटर लांबीचे किंमत १,९६,०००/-रु, २) ०२ नग ईलेक्ट्रीक पोल १३ मीटर लांबीचे किंमत ५६,०००/-रु, असे एकुण २,५२,०००/-रु चे लोखंडी ईलेक्ट्रीक पोल कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी चोरी करुन नेले अशा फिर्यादीचे तकारी वरुन पोलीस स्टेशन खंरागणा येथे अप क्रमांक ४३५/२०२४ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद असुन तपासावर आहे.

सदर गुन्हयाचा स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे समांतर तपास करीत असतांना गोपनीय माहीतीचे आधारे संशयीत आरोपी नामे १) आशिष वासुदेवराव वडे, वय २९ वर्षे, रा. कासारखेडा ता. आर्वी जि. वर्धा, २) मनोज शेषराव ढाले, वय ३६ वर्षे, रा. बाबुळगाव (बाबापुर) ता. सेलु जि. वर्धा, ३) शैलेश शांताराम खोडे, वय ३४ वर्षे, रा. बाबुळगाव (बाबापुर) ता. सेलु जि. वर्धा, ४) प्रकाश गणपतराव थोराने, वय ४६ वर्षे, रा. मजरा, ता. आर्वी जि. वर्धा, यांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयासंबंधाने सखोल विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे परीचयाचा ठेकेदार आरोपी कमांक ५) दिलीप सानसी, रा. मध्य प्रदेश (पसार) यांचे सांगणे प्रमाणे सदरचे ईलेट्रीक पोल आरोपी क्रमांक ६) गणेश भाष्करराव आत्राम, वय २७ वर्षे, रा. कासारखेडा ता. आर्वी जि. वर्धा, याचे ट्रॅक्टर मध्ये व मिनी डोर अॅटो कमांक मध्ये भरुन त्यांचे परीचयाचा आरोपी क्रमांक ७) पंकज वसंतराव डोंगरे, वय ३२ वर्षे, रा. बत्रा लेआउट विजय लॉनच्या मागे सांवगी (मेघे), वर्धा, यांना विकी केल्याचे सांगीतले वरुन सर्व आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचे पासुन गुन्हयातील चोरीस गेलेले १) १४ नग ईलेक्ट्रीक पोल १० मीटर लांबीचे किंमत १,९६,०००/-रु, २) ०२ नग ईलेक्ट्रीक पोल १३ मीटर लांबीचे किंमत ५६,०००/-रु, ३) ०८ नग ईलेक्ट्रीक लोखंडी पोल चे लहान मोठया आकाराचे तुकडे किंमत ३५,०००/-रु, ४) एक मंहीद्रा कंम्पनीचा ट्रॅक्टर ५७५ डीआय कमांक एमएच ३२ ए.एच. ९५४२ किंमत ७,५०,०००/-रु, ५) एक मिनी डोर अॅटो कमांकएमएच ३२ बी ७२८४ किंमत १,६०,०००/-रु, ६) एक ईलेक्ट्रीक कटर मशीन केबलसह किंमत ५,०००/-रु, ७) दोन अॅन्ड्राईड मोबाईल किंमत ३५,०००/- रु असा एकुण १२,३७,०००/- रु, माल त्यांचे कळुन जप्त करुन सदरचा गुन्हा उघडकीस आनुन सदर आरोपीतांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन खरांगणा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची महत्वपुर्ण कारवाई मा. श्री. नूरुल हसन पोलीस अधिक्षक, वर्धा, मा. श्री. सागर कवडे, अप्पर पोलीस अधिक्षक, वर्धा यांचे मार्गदर्शन व निर्देशाप्रमाणे श्री. संजय गायकवाड पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशा प्रमाणे श्री. उमाकांत राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अमलदार चंद्रकांत बुरंगे, गजानन लामसे, महादेव सानप, रितेश शर्मा, पवन पन्नासे, मनिष कांबळे, गोपाल बावणकर, मंगेश आदे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये