Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना व जिवती तालुक्यात टीबीच्या निदानासाठी येणार मोबाईल एक्स-रे व्हॅन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

संपूर्ण भारत देश सन 2025 पर्यंत टीबीमुक्त करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त संशयित टीबी रुग्ण शोधून त्यांचे एक्स-रे मशीन किंवा थुंकीद्वारे आजाराचे निदान करून व त्यांना तात्काळ उपचाराखाली आणून आपल्याला समाजातून टीबी मुक्त करायचं आहे याच हेतूने नागपूर येथील एमटीडीसी अंतर्गत मोबाईल मेडिकल व्हॅन छातीचा एक्स-रे काढण्यासाठी दिनांक 5 जून 2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे येत आहेत तसेच कोरपना तालुक्यात सहा जूनला प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा इथे ती उपस्थित राहणार आहेत.

तरी जिवती व कोरपणा तालुक्यातील सर्व संशयित टीबी रुग्णांनी आपल्या जवळच्या आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी व दिनांक 5 जूनला जिवती येते तर सहा जूनला प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथे उपस्थित रहावे .टीबीची प्रमुख लक्षणे ही वजनात लक्षणीय घट, 15 दिवसापेक्षा जास्त खोकला असल्यास, सतत अंगात बारीक ताप राहणे ,अन्न खायची इच्छा न होणे थुंकित ना रक्त पडणे व इत्यादी प्रमुख लक्षणे आहेत. तसेच आपण जर टीबी रुग्णाच्या संपर्कात असाल तर आपण सुद्धा आपला छातीचा एक्स रे काढून घ्यावा व समाजाला व देशाला टीबीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सहकार्य करावे. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेंभे यांनी केले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये