ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बैलंपुर येथे अल्ट्राटेक कंपनीच्या वतीने कचरा कुंडी व बेंचेसची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगडचे सभोवतालील गावाकडे विशेष लक्ष्य आहे. अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोवतालील गावांच्या विकासा कडे विशेष लक्ष्य देतांनी दिसत आहे, त्यासाठी आपले सर्व प्रयत्न पणाला लावत आहेत. त्यातच माणिकगढने आपल्या सी.एस.आर. मार्फत बैलमपूर ते नोकारी (अमलनाला) रोड ने ये-जा करणाऱ्या गांवातील लोकांना बसण्याकरिता एकूण २७ बेंचेस तर रोड वरती कचरा जमा होऊ नये या करीत २५ मजबूत डस्टबिन्स लावण्यात आले.

या उपक्रमामुळे रोडचे सुंदरीकरण वाढण्यास व लोकांचा बस किंवा ऑटो ची वाट बघताना जो उभे राहण्याचा त्रास होत होता तो कमी झाला तर लोंकांमध्ये कचरा,डस्टबिन्स मधेच टाकावा हा संदेश सुद्धा गेला.

बैलमपूर गावाचे उपसरपंच अशोक चांदेकर व गावकऱ्यांनी या कार्यास यशस्वी करण्यास सहकार्य केलेत तर माणिकगढ,सी. एस.आर.ने अथक प्रयत्न केलेत तसेच गावकऱ्यांनी याबद्दल माणिकगढचे आभार सुद्धा व्यक्त केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये