ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भांदक रेल्वे स्थानक असुविधाच्या विळख्यात

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करा अन्यथा आंदोलन : अनिल कुमार राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा युवा उपाध्यक्ष सुमित हस्तक व जिल्हा सहसचिव सोनल पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तसेच भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम यांच्या नेतृतवात आम आदमी पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक भांदक येथे रेल्वे मुख्य प्रशासक भांदक यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे स्थानकावर योग्य पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवरील सर्व फॅन सुरू करने, स्वच्छतागृहे साफसुथर ठेवणे आणि 24 तास पाणी पुरवठा राहणे, रेल्वे व्यवस्थापकांची वेळेवर कार्यालयात उपस्थिती राहणे या मुद्द्यांवरही भर देण्यात आला.

रेल्वे व्यवस्थापकांनी या मागण्यांवर समाधानकारक उत्तरे मागण्यात आली. परंतु आम आदमी पार्टीकडून असा मुद्दा मांडण्यात आला की केंद्र सरकारने वंदे भारत रेल्वेसारख्या मोठ्या योजना जाहीर करत असताना मुलभूत सुविधा पुरवण्यास अपयशी ठरले आहेत व हे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांचा केंद्र सरकारवरचा विश्वास डळमळतो.

या निवेदनादरम्यान जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, जिल्हा युवा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सहसचिव सोनाल पाटील, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, संस्थापक सदस्य राजकुमार चट्टे, सचिन पाटील, रितेश नगराळे, विनीत निमसरकार, निखिलभाऊ जट्टलवांर, विजय सपकाळ, सरताज शेख, वसीम कुरेशी, आशिष भाऊ तांडेकर, घनश्याम गेडाम, केशव भाऊ पचारे, बळुभाऊ बांदुरकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये