गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेती माफीया विरुध्द पोलिसांची धडाकेबाज कारवाई :12 आरोपी अटकेत

एकूण 2 करोड 60 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्हा घटना तारीख वेळ  दि. 22/05/2024 चे वेळी मुखबिराकडून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती  मिळाली असता, रेती माफीया विरुध्द मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांची धडाकेबाज कार्यवाही करीत एकूण 2 करोड 60 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीं नामे 1) भुषण वाघमारे रा.सेलु जि. वर्धा 2) सतिश वाघमारे रा.सेलु जि. वर्धा 3) सुरज होले रा. वर्धा 4) संदिप रामदास मडावी रा. धनोली मेघे ता.सेलु जि. वर्धा 5) नामदेव गोडामे रा. सलाई पेवट ता. सेलु जि. वर्धा 6) चंदु साखरे रा. येराखेडी ता.सेलु जि. वर्धा 7) सुरज दाते रा. हिंगणी ता. सेलु जि. वर्धा 8) अरविंद राय 9) महेश बहिरे रा. दहेगांव 10) निखिल रोकडे रा. सिंदी 11) संजय ससाने रा. पारडी ता. समुद्रपुर जि. वर्धा 12) निखिल गोडकर या बारा आरोपींना अटक केली आहे.

सदर छापा कार्यवाही नंतर मा. पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने पुढील कार्यवाही श्री. रोशन पंडीत, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, श्री कांचन पांडे पो.नि. आर्थिक गुन्हेशाखा श्री. संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा सोबत आर.सि.पी. पथक यांनी पुढील कार्यवाही मध्ये सहभाग घेतला.

सदर झालेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त

1) अशोक लेलैंड कंपनीचा दहा चाकी टिप्पर एम.एच 32 ए.जे. 5588 ची किंमत 30,000,00/- रुपये

2) अशोक लेलैंड कंपनीचा टिप्पर एम. एच.32 एजे 3388 काळ्या रेतीने भरलेला 30,000,00/- व रेती किंमत 20,000/- रु.

3) अशोक लेलैंड कंपनीचा टिप्पर एम.एच 32 एजे 7162 किमंत 30,000,00/- रुपये

4) अशोक लेलैंड कंपनीचा टिप्पर एम.एच.32 एजे 1006 किंमत 30,000,00/- रुपये

5) टाटा ए. एल 613 टर्बो कंपनिचा एम.एच 31 सि.बी. 6030 किंमत 30,000,00 /- रुपये

6) एक हिटाची कंपणीची एक्स 200 एल.सी. मॉडल बिना क्रमांकाचे पोखलँड मशिन किमंत 65,000,00/- रुपये

7) एक टाटा कंपनीचा एम. एच 40 बीई. 6866 क्रमांकाचा जे.सि.बी. 25,000,00/- रुपये 8) एक टाटा हॅरियर एम.एच 32 ए. एस 7766 किमंत 20,00,000/- रुपये असा एकुण जुमला किंमत 2,60,20,000/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला तसेंच नदीच्या पात्रात कृत्रीम रित्या एकत्रीत केलेले रेतीचो ढीग दिसुन आले. त्यापैकी रेतीचे ढीग वगळता उर्वरीत मु‌द्दे‌माल पंचासमक्ष ताब्यात घेतला.

कार्यवाही करणारे अधिकारी व अमंलदार मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन सा. (भा.पो.से.)यांचे सह 1)श्री. राहुल चव्हाण (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक सा. उपविभाग पुलगांव 2) पो.उप.नि. दिपक निंबाळकर पोलीस स्टेशन पुलगांव 3) पो.शि रामदास दराडे 4) पो..शि. भुषण हाडके आणि पोलीस मुख्यालय येथील पथक यांनी सदर कार्यवाही केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये