स्व. संगिता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपनाचा उत्कृष्ट निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी, गडचांदुर द्वारा संचालित स्व. संगिता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा.कोरपना विज्ञान शाखेचा 100 टक्के तर कला शाखेचा 94.47 टक्के निकाल लागला.
यात महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक श्रेया रवी उमरे (81.33) , द्वितीय क्रमांक कु.अनुजा किर्तिराव शेडमाके (77.33टक्के) तर तृतीय क्रमांक गौतमी विनोद येलेकर( 71.83 टक्के) व कला शाखेतून प्रथम क्रमांक वैष्णवी कानु मेश्राम (73.08), द्वितीय क्रमांक सहील गणपत जमापलावर (63.83टक्के) तर तृतीय क्रमांक कू.स्वाती लच्चू सिडाम (59.17)या परीक्षेत विज्ञान शाखेत एकून 69 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एकूण 69 विद्यार्थी पास झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी, गडचांदुर अध्यक्ष श्री मनोहरराव चटप, कोषाध्यक्ष श्री.जयवंत वानखेडे, संचालक मंडळ, स्व. संगिता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना प्राचार्य बि जी खडसे, व सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.