चकपिरंजी येथे गावपातळीवरील शेतकरी गट प्रशिक्षण कार्यक्रम
पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे आयोजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार
दिनांक १७/०५/२०२४ रोज शुक्रवारला डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक मिशन सन २०२४-२५ अंतर्गत साई श्रेया फार्मर प्रो. कंपनी चकपिरंजी अंतर्गत दोन गटाचे गावपातळीवरील शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रीती हिरळकर प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर,श्री पानसे मंडळ कृषी अधिकारी सावली, अल्का स्वामी सीइओ साई श्रेया फार्मर प्रो. क.चकपिरंजी अनिलभाऊ स्वामी संचालक साई श्रेया फार्मर प्रा.कंपनी चकपिरंजी, फुलझेले व्यवस्थापक महाबीज हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सेंद्रिय शेती हे काळाची गरज असून १० ड्रम थेरी चे वापर करून शेतकरी यांनी सेंद्रिय शेती करायला पाहिजे असे प्रतिपादन प्रकल्प संचालक चंद्रपूर यांनी केले.श्री पानसे यांनी दशपर्णी,जीवाअमृत, बिजामृत,तसेच १० ड्रम थेरी बाबत माहिती सांगण्यात आले त्या नंतर मेटाराईझम या बाबत श्री हताझाडे यांनी प्रात्याक्षिक करून दाखविले.तसेच सदर कार्यक्रमात जैविक निविष्ठा केंद्र गट व कंपनी स्थापनेबाबत माहिती,माती परीक्षण,PDNSM योजना बाबत माहिती श्री कावळे बीटीएम यांनी समजावून सांगितले. सदर प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी गटांनी घेतला.



