Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रावेरी येथे १७ मे ला सीतानवमी उत्सव सोहळा

चंंद्रपूूरच्या नंदा बुरडकर व विठाबाई मुन स्वयंसिध्दा सीता पुरस्काराच्या मानकरी

चांदा ब्लास्ट

सीतानवमीच्या पावन पर्वावर दिनांक १७ मे २०२४ ला दुपारी एक वाजता शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी यांनी स्वखर्चाने जीर्णोध्दार केलेल्या रावेरी, जिल्हा येथील सीतामंदिर प्रांगणात स्वयंसिध्दा सीता सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात ज्या महिलांनी पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतर हिंमत न हारता संयमाने विपरीत परिस्थितीत व समाजव्यवस्थेशी संघर्ष करून आपल्या पाल्यांना लवकुशाप्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर व समाजातील प्रतिष्ठीत आणि सन्माननीय नागरीक म्हणून घडवले आहे. अशा कर्तुत्ववान धैयशील मातांचा भावपूर्ण सत्कार होणार आहे. यावर्षी राधा केला (आर्वी), नंदा बुरडकर (चंद्रपूर), विठाबाई मुन, (चंद्रपूर), लता ढवस (राजुरा), पुष्पा काकडे,(रावेरी), छाया पिदुरकर (गडचांदूर) या मातांची निवड करण्यात आली आहे.

         या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ॲड.वामनराव चटप भूषविणार असून उद्घघाटन स्वभापचे माजी प्रांताध्यक्ष अॅड. दिनेश शर्मा करणार आहेत. प्रमुख अतिथी शेतकरी महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष प्रज्ञा बापट, माजी प्रांताध्यक्ष शैला देशपांडे, आर्वी, माया पुसदेकर,अमरावती, प्रज्ञा चौधरी, यवतमाळ, ज्योस्ना मोहितकर, चंद्रपूर, ज्योत्स्ना बहाळे,अकोला, सुहासिनी वानखेडे, अकोला, रंजना मामर्डे,अमरावती, वर्षा तेलंगे, संचालिका,जि.म.सह.बँक यवतमाळ, सोनाली मरगडे, जिल्हाप्रमुख, शेतकरी महिला आघाडी, यवतमाळ, वर्षा बोरेकर,संचालिका, तालुका खरेदी विक्री संस्था, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे,मधुसूदन हरणे,गुणवंत हंगरगेकर,सतीश दाणी,नारायण काकडे विनोद काकडे,रावेरी सरपंच राजेंद्र तेलंगे,संदीप तेलंगे,बाळासाहेब देशमुख,महेश सोनेकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सीता नवमी महिला उत्सव समिती, शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, हनुमान देवस्थान ट्रस्ट रावेरी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये