Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वादळामुळे व अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यता

आवश्यक उपाययोजना करावी - नगरपरिषद वर्धा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा शहरातील सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये वर्धा शहरातील सर्व शिकस्त / धोकादायक इमारतीचा वापर त्वरीत बंद करावा व दुरुस्तीची योग्य ती खबरदारी घ्यावी. आवश्यक ती उपाय योजना न केल्यास वादळामुळे व अतिवृष्टीमुळे जीवितहानी, वित्तहानी, किंवा इतर बाबत नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आपली ईमारत शिकस्त नाही असे आपणास वाटत असल्यास सक्षम Structural Engineer (पदव्युत्तर पदवी व किमान २ वर्षे अनुभव असलेला) कडून आपल्या इमारतीचे Structural audit करून ते Certificate व Report नगरपरिषदेस ही नोटीस प्राप्त झाल्याच्या १५ दिवसात सादर करावी. नाल्यालगत राहणाऱ्या लोकांना सूचित करण्यात येते कि, पावसाच्या प्रवाहामुळे मातीची झीज होते. त्यामुळे नाल्यालगत अस्तित्वात असलेल्या घराचा भाग खचून जीवित वा वित्तहानी होऊ शकते, त्यामुळे आपले वास्तव्य नाल्याच्या दूर करावे तसेच आवश्यक उपाययोजना करावी.

संबंधित शिकस्त इमारत वा इमारतीचा भाग पडुन व नाल्यालगत प्रवाहामुळे इमारत खचून जीवितहानी, वित्तहानी व कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यासाठी नगर परिषद जबाबदार राहणार नाही. ती सर्वस्वी आपली जबाबदारी राहील. याची प्रामुख्याने नोंद घ्यावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये